ही निर्धार सभा नाही तर विजयी सभा* : सौ. शौमिका महाडिक

Spread the news

*ही निर्धार सभा नाही तर विजयी सभा* :
सौ. शौमिका महाडिक

कोल्हापूर :
बोलण्यापेक्षा कृतीवर भर देवून प्रभागातील प्रश्न सोडवणार्‍या अमल महाडिक यांच्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने आज तुम्ही सगळे उपस्थित आहात. ही गर्दी दक्षिणेतील वारं फिरलय याची साक्ष देणारी आहे. म्हणूनच ही निर्धार सभा नाही तर ही विजयी सभा आहे, असे सांगून ही गर्दीच सांगते आहे की आता महाराष्ट्रात पुन्हा महयुतीचंच सरकार येणार, असा दृढ निश्चय सौ. शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ वसगडे गावात आयोजित करण्यात आलेंल्या निर्धार सभेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, महायुतीच्या सरकारनं सर्वसामान्य नागरीक आणि महिला यांना केंद्रबिंदु मानून सर्व योजना राबवल्या. ज्याचा लाभ लाभार्थ्यांना थेट आपल्या खात्यावर जमा होतो. या योजना केवळ कागदावर राहिलेल्या नाहीत तर त्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचल्या आहेत आणि सर्व लाभार्थी याचा लाभ घेत आहेत. या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे श्रेय मात्र अमल महाडिक यांना जाते. त्यामुळे जर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असेल तर कोल्हापूर दक्षिण मतदार संघात महायुतीचा आमदार असलाच पाहिजे. आणि आज इथे जमलेल्या या गर्दीने आपण सगळे अमोल महाडिक यांच्या मागे आहोत हे दाखवून दिले आहे.
त्या पुढं म्हणाल्या, विद्यमान आमदारांनी केवळ विकास कामाच्या गप्पाच मारल्या. नुसती आश्वासने देवून दक्षिण मतदार संघाचा पार बोजवारा उडवून टाकला. कचरा, घाण, खड्डेयुक्त रस्ते, खंडित असणारा पाणी पुरवठा, तुंबलेल्या गटारी यामुळे दक्षिण मतदार संघ पार क्षीण करुन टाकला.
प्रत्येक गावातील नागरीकांच्या विद्यमान आमदारांबाबत अनेक तक्रारी आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून आमदारांनी नेमकं काय केलं हा प्रश्न उपस्थित राहतो. गेल्या पाच वर्षात आमदार भागात फिरकलेही नाहीत.
त्या म्हणाल्या, विद्यमान आमदार प्रभागात कामं करायला निधी कमी पडल्याचं ते सांगतात दुसर्‍यांनी मंजूर करुन आणलेल्या योजनांची उद्‌घाटनं करुन, नारळ फोडून श्रेंय लाटण्याचं राजकारण त्यांनी नेहमीच केलं आहे. पण आता या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. तुम्ही केलेल्या विकास कामांच्या व स्कॅन कोड मुळे आता तुमची चांगलीच पोलखोल झाली आहे. आता विजयाचा गुलाल अमल महाडिक यांनाच लागणार असल्याचा निर्धारही सौ. शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.
या सभेस माजी सरपंच नेमगोंडा पाटील, रामगोंड पाटील, तंटामुक्त अध्यक्ष युवराज सुर्यवंशी, सरपंच योगिता बागडी्, शशिकिरण हेरवाडे, गजेंद्र कांबळे,सचिन राऊत, प्रदिप सुर्यवंशी , सुनील पात्रे, अभिजित गाट,राजू कवटगे,किरण पाटील (पासगोंड) , वर्षा कांबळे, सचिन कांबळे, ग्रां स अभय परिट, राजू कोगनोळे, संजय शिंदे, कुबेर गाट, राजगोंडा सुर्यवंशी, बाळासो कुंभार, महावीर गवळी, रोहित भोसले, सखाराम पांढरबळे, महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते, तरूण मंडळे आणि ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!