दक्षिणच्या विकासासाठी अमल महाडिक यांचे प्रामाणिक प्रयत्न – कृष्णराज महाडिक* 

Spread the news

*दक्षिणच्या विकासासाठी अमल महाडिक यांचे प्रामाणिक प्रयत्न – कृष्णराज महाडिक*

कोल्हापूर – माझ्या जन्माच्या आधीपासून महाडिक कुटुंब कोल्हापूरच्या लोकांसाठी काम करते आहे. त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. अमल महाडिक देखील अत्यंत प्रामाणिक पणे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत, असा विश्वास युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.

नागाव येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते. “२०१४ ते २०१९ या आपली आमदारकीच्या काळात अमल महाडिक यांनी मतदारसंघात जास्तीत विकासकामे केली. भागातील पायाभूत सुविधांसाठी शेकडो कोटींचा निधी खेचून आणला. शिवाय येथील नागरिकांचा आर्थिक व सामाजिक स्तर वाढावा यासाठी देखील प्रयत्न केले. त्यांनी मंजूर केलेली अनेक कामे पुढे पूर्ण झाली. आपण सर्वानी हे पहिले आहे. असे ते यावेळी म्हणाले.”

“त्यांच्याकडे युवापिढीच्या प्रगतीचे एक व्हिजन आहे. युवकांना सकारात्मक मार्गाने पुढे घेऊन जाण्यासाठीचा त्यांचा अजेंडा अत्यंत महत्त्वाचा आहे. तरुणांना एकत्र करून मतदारसंघात विधायक उपक्रम राबविण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. याचा प्रत्यय ते आमदार नसताना देखील त्यांनी केलेल्या कामावरून नागरिकांना आला आहे. त्यामुळे आम्हांला खात्री आहे, येणाऱ्या निवडणुकीत विजय त्यांचाच आहे.” असे त्यांनी सांगितले.

कृष्णराज यांनी यावेळी महायुती सरकारच्या महत्त्वपूर्ण कामांची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात परत आणून सरकारने महाराष्ट्राचा अभिमान वाढवला असल्याचे ते म्हणाले. याच सरकारच्या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शिवाय महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यांना सबल करण्यासाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय याचाही उल्लेख त्यांनी केला.

पुढील पाच वर्षात मतदारसंघात काय कामे झाली पाहिजेत याचा एक अभ्यासपूर्ण आराखडा अमल यांनी तयार केला आहे. त्यांच्या या अभ्यासाला प्रत्यक्ष कामाची जोड देण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी त्यांना मत देऊन बहुमताने निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सभेला गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक, शेतकरी संघटनेचे नेते प्रा. जालिंदर पाटील, ग्रीष्मा महाडिक, सुवर्णा महाडिक, रंगराव तोरस्कर, माजी सरपंच संगीता मगदूम, अण्णासो कोराणे, सात्ताप्पा पवार, तानाजी राणगे, चेतना कांबळे, तुकाराम बोडके, पवन शेटे, बिपिन पाटील, भगवान कोराणे, किरण पोवार, चेतन पाटील, प्रमोद अतिग्रे, सुभाष कांबळे, विनायक सरदेसाई, सदाशिव मगदूम यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व तमाम जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!