*राजेंद्र नगर वासियांसाठी मुबलक पाणी, कचरा उठाव व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणार – अमल महाडिक*

Spread the news

*राजेंद्र नगर वासियांसाठी मुबलक पाणी, कचरा उठाव व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणार – अमल महाडिक*

कोल्हापूर – राजेंद्र नगर वासियांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळात येथील नागरिकांना मुबलक पाणी पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच येथील आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांनी केले.

राजेंद्र नगर येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते. ‘या परिसरातील नागरिकांच्या रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन याबाबतच्या समस्या मी गेले अनेक दिवस ऐकतो आहे. त्यासाठी मी काम करण्यास सुरुवातही केली आहे. पद नसताना देखील मी लोकांच्या या सुविधांसाठी प्रयत्नशील राहिलो आहे.” असे ते म्हणाले.

या परिसरातील युवकांसाठी रोजगार निर्माण व्हावा म्हणून काही कार्यक्रम आखण्याचे आमचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठीची तरतूद महायुती सरकारने याआधीच करून ठेवली आहे. तसेच तरुणांना विद्यावेतन देण्याची योजना सरकारने जाहीरनाम्यात योजली आहे. सरकारच्या या योजनांचा लाभ सर्वाना मिळावा यासाठी मी तत्पर आहे. असे म्हणत त्यांनी युवकांना विकासाच्या महायुती सरकारला सोबत द्या असे आवाहन केले.

दरम्यान महायुती सरकारच्या वार्षिक ३ मोफत सिलिंडर, आनंद शिधा, मुलींना मोफत उच्च शिक्षण, वयोश्री योजना, महात्मा फुले जन आरोग्य, आयुषमान भारत योजनांचा उल्लेख त्यांनी केला.  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा सन्मान करणारे महायुती सरकार सदैव आपल्या विकासासाठी कटीबद्ध आहे. दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधायक योजनांच्या माध्यमातून अंत्योदय घटकातील नागरिकांसाठी काम केले आहे. सर्वांना सर्वोत्तम सुविधा पुरवून देशाला महासत्ता बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करत त्यांचे हात बळकट करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सभेला संग्राम निकम, माजी नगरसेवक रूपाराणी निकम, महेश वासुदेव, आरपीआयचे शहराध्यक्ष सुखदेव बुधाळकर‌, आरपीआयच्या कामगार आघाडीचे प्रदेश सदस्य गुणवंत नागटीले, विक्रम बांदिवडेकर, अजिंक्य जाधव, बंडा किल्लेदार, महंमद मकानदार, पल्लवी किल्लेदार, संपदा काळे, आरपीआयचे शहराध्यक्ष (कवाडे गट) सोमनाथ घोडेराव, दत्ता लोखंडे, प्रसाद पाटोळे, महादेव बिरजे, नामदेव नागटीळे, बंकट सूर्यवंशी यांच्यासह राजेंद्र नगर मधील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर व तमाम जनता उपस्थित होती.

*चौकट*
*रस्त्यावर उतरावे लागले तरी…*
दक्षिण मतदारसंघातील नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय पूर्णत्वास नेण्याचा निर्धार मी केला आहे. काही भागातील नागरिकांना कार्ड करून दिले आहे. आता उरलेल्या सर्व नागरिकांची प्रॉपर्टी कार्ड करून देण्यासाठी मी काम करणार आहे. यासाठी मला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल. पण हे काम केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असे महाडिक यांनी सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!