Spread the news

 

वडगाव बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी विक्रेत्यांशी संवाद

इचलकरंजी : येथील वडगाव बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी विक्रेत्यांशी संवाद साधला. कारंडे यांनी मॉर्निंग वॉक दरम्यान वडगाव बाजार समितीमधील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी समितीने कारंडे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. या विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत ते सोडवण्याचे आश्वासन कारंडे यांनी यावेळी दिले.
महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे पाठिंबा दिल्याबद्दल तसेच कारंडे यांना भरघोस मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन , कॉ. सदा मलाबादे यांनी केले. यावेळी बजरंग डोईफोडे, अशोक गदगे, शिवाजी शिंदे, सफलचांद शेख, राजू आवळे, निर्मल कांबळे, अक्काताई चव्हाण, मनिर बागवान, बाबू पनोरी आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!