लोककल्याणकारी योजनांना खोडा घालणाऱ्या काँग्रेस उमेदवाराला त्यांची जागा दाखवा
शिवसेनेच्या संपर्कप्रमुख शारदा जाधव यांचे आवाहन
कोल्हापूर
विधानसभेच्या निवडणूक भावनिक होऊन जिंकता येत नाही,मात्र काँग्रेस उमेदवार भावनिक होऊन मतदान मागत आहे,लोककल्याणकारी योजनांना खोडा घालणाऱ्या काँग्रेस उमेदवाराला त्यांची जागा द्यावी, वेळ आपली आहे ,आता चंद्रदीप नरके यांना करवीरच्या जनतेने निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन शिवसेनेच्या संपर्कप्रमुख शारदा जाधव यांनी केले.
कोथळी (ता. करवीर) येथील अमृत वर्षा हॉलमध्ये परिते जि.प.मतदार संघातील शिवसेना,भाजप व मित्रपक्षांच्या महिला मेळाव्यात संपर्कप्रमुख जाधव बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कांडगावच्या सरपंच तेजस्विनी चव्हाण होत्या.
संपर्कप्रमुख जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील सर्व घटकांसाठी अनेक योजना सुरू केल्याचे सांगून भविष्यात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी खोटे नॅरेटीव्ह करून लाडकी बहिण योजना बंद होणार असे सांगत योजनेला विरोध करीत होता, मात्र बहिणी चिडल्यामुळे आता तुम्ही सत्तेत आल्यावर ३ हजार रुपये कसे काय देणार असा सवाल केला.आमच्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा ढापल्याचे त्या म्हणाल्या. निवडणुकीसाठी पुढे आलेल्या काँग्रेस उमेदवाराला त्यांची योग्य जागा दाखवून द्यावी असे आवाहन त्यांनी केले. गेली पाच वर्षे मतदार संघ विकासाविना वंचित राहिल्याने पाच वर्षे वाया गेल्याचे त्या म्हणाल्या. ज्यांनी भोगावती कारखाना ४०० कोटी रुपयांच्या कर्जात बुडवला, त्यांनी कोजनरेशन, इथेनॉल,डिस्टिलरी अशा प्रकल्पाने सज्ज असलेल्या कुंभीवर टीका करू नये असे त्या म्हणाल्या. स्वतःच्या गावात गटारी, रस्ते करता आले नाहीत, त्यांना निवडणुकीतून पराभूत करून चंद्रदीप नरके यांना विधानसभेत पाठवावे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना महिला प्रमुख शुभांगी पोवार यांनी नरके कुटुंबाकडून मानसन्मान सर्वांना मिळत असल्याचे सांगून महिलांनी घासून, ठासून चंद्रदीप नरके यांना निवडून द्यावे असे आवाहन केले. सतत करवीर तालुक्याच्या प्रत्येक गावात,गल्लीत असणाऱ्या या कर्तबगार लोकप्रतिनिधीला विधानसभेत पाठवावे असे आवाहन त्यांनी केले.
ऐश्वर्या पोळ चंद्रदीप नरके यांनी आपल्या कालखंडात रस्ते,गटारी,सांस्कृतिक हॉल, पूल, साकव अशी प्रचंड विकासकामे केल्याचे सांगून आता वेळ आपली आली आहे, भगिनींनी लाट निर्माण करून इतिहास घडवावा असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत अजित पाटील (परितेकर) यांनी केले. यावेळी करवीर महिला शिवसेनाप्रमुख सुधाताई पाटील, आरे उपसरपंच वैशाली वरुटे,डॉ.सुप्रिया पाटील, देविका फाटक,प्रिया क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केली. या मेळाव्याला श्रीमती शैलजादेवी नरके, सौ.राजलक्ष्मी नरके,सौ.शिल्पा नरके माजी सरपंच अक्काताई कारंडे ,सरपंच प्रज्ञा पाटील (हळदी ),जयश्री पाटील (परिते),गौरी रावडे,वंदना पाटील,कोमल आरेकर,नंदिनी चौगले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
-भोगावती कर्जबाजारी तुम्ही केला-
आरेच्या उपसरपंच वैशाली वरुटे यांनी चांगल्या पद्धतीने चाललेल्या कुंभी कारखान्यावर टीका करून विरोधक मतदारांची फसवणूक करीत असल्याचे सांगून तुम्ही भोगावती कारखाना कर्जबाजारी केला असा घनाघात केला.