डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचविण्यासाठी साथ द्या : राजे समरजितसिंह घाटगे यांचे आवाहन…….
मुश्रीफांच्या भ्रष्ट,घोटाळेबाज मालिकांनी कागलची बदनामी : ॲड.सुरेश कुराडे………
चिखली येथील महाविकास आघाडीच्या प्रचारसभेस उदंड प्रतिसाद………..
हमिदवाडा / प्रतिनिधी
पालकमंत्री महोदय मंत्रीपदाची शपथ घेताना संविधानाचा मान-सन्मान राखण्यासाठी मी सदैव कटीबद्ध असेन ,संविधानाचे मी रक्षण करेन अशी संविधानावर हात ठेऊन शपथ घेता . मग निवडणुकीत केवळ आपल्यालाच मतदान मिळावे यासाठी तुम्ही संविधानातील तरतुदीनुसार महिलांना मिळणाऱ्या शासकीय योजना बंद करण्याच्या सरळ सरळ धमक्या का देत आहात ? असा सवाल उपस्थित करून पालकमंत्र्यांच्या या हुकूमशाही प्रवृत्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला संविधानाद्वारे दिलेले हक्क आणि अधिकारच धोक्यात आले आहेत .याचा सुज्ञ जनतेने अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली असून भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचे संविधान वाचविण्यासाठी आणि माता-भगिनींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या या हुकूमशाही प्रवृत्तीला हद्दपार करा असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
नानीबाई चिखली (ता.कागल) येथे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
श्री.घाटगे पुढे बोलताना म्हणाले, कोल्हापुरात अकराशे बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत. मात्र ज्या मतदारसंघाने गेली 25 वर्षे त्यांचा सांभाळ केला त्या मतदारसंघात निदान पाचशे बेडचे तरी हॉस्पिटल उभारण्याची त्यांना सुबुद्धी का सुचली नाही ? आपल्या भावी पिढ्या व्यसनांध करण्यासाठी आणि त्यांना बेरोजगार करण्यासाठी त्यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत.ही खूपच दुर्दैवाची बाब आहे. महिलांना केवळ सहलीला घेऊन जाणे हे महिला सबलीकरणाचे मापदंड नाही.त्यामुळे आपल्या सर्वांच्या हक्काचा आमदार म्हणून आम्हाला एक संधी द्या,तालुक्यातील बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि आपल्या जिव्हाळ्याचे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे सांगितले..
ॲड.सुरेश कुराडे म्हणाले ,मुश्रीफांनी स्वतःच्या स्वार्थापोटी दिवंगत खास. सदाशिवराव मंडलिक यांना प्रचंड नाहक त्रास दिला.त्यांना खूप वेदना दिल्या.तो त्रास आणि वेदना मंडलिक साहेबांवर प्रेम करणारी जनता विसरलेली नाही. मुश्रीफांच्या भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज प्रकरणांनी शाहुंच्या कागलची बदनामी राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली आहे. याची जाणीव मतदारांना झालेली असून या निवडणुकीत ही स्वाभिमानी जनता नक्की परिवर्तन घडवून आणेल..
बाबासाहेब पाटील,दत्तोपंत वालावलकर,संभाजी भोकरे,सागर कोंडेकर, शिवाजी कांबळे, अनिल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजे विरेंद्रसिंह घाटगे, अतुल दिघे, शिवानंद माळी,दत्तामामा खराडे,वाय.टी.पाटील,बाळासो काटकर,मल्लू जंगम यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांचे प्रमुख,कार्यकर्ते,पदाधिकारी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत बाजीराव पोवार यांनी केले प्रास्ताविक एस.टी.पाटील यांनी केले.आभार सर्जेराव वाडकर यांनी मानले…..
चौकट —————
पालकमंत्र्यांच्या विकासकामांच्या
पुस्तकाची चौकशी लावा……
गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील म्हणाले,तालुक्यात केलेल्या विकासकामांची पुस्तिका मुश्रीफ साहेबांनी काढलेली आहे. ही विकासकामांची पुस्तिका नव्हे,तर सरळ सरळ मतदारांच्या हातात त्यांनी त्यांच्या बोगस आणि बनावट कामांची यादीच दिली आहे. बरं झालं साहेब तुम्ही ही पुस्तिका काढली.या पुस्तिकेमुळेच तर राजे समरजितसिंह घाटगे यांचा विजय सुलभ झालेला आहे. राजेसाहेब तुम्ही आता आमदारच नव्हे तर या राज्याचे कॅबिनेट मंत्री होणार आहात.सत्तेत आल्यानंतर तत्काळ पालकमंत्र्यांच्या या सात हजार कोटींच्या विकासकामांच्या पुस्तकाची चौकशी लावा आणि त्यातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडा, असे बोलताच उपस्थित सर्वांनीच दाद देत टाळ्यांच्या कडकडाटात राजे समरजितसिंह घाटगे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या….
छायाचित्र ——– चिखली (ता.कागल) येथे महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलताना राजे समरजितसिंह घाटगे, ॲड.सुरेश कुराडे समोर उपस्थित जनसमुदाय……