कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सभेला उपस्थित राहून, प्रियंका गांधी यांची निर्णायक सभा यशस्वी करावी;
आमदार सतेज पाटील..
सभेच्या नियोजना संदर्भात, गांधी मैदान या ठिकाणी भेट देऊन केली पाहणी
,
कोल्हापूर
काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची, उद्या शनिवारी गांधी मैदान या ठिकाणी जाहीर सभा होत आहे. या सभेच्या अनुषंगाने आमदार सतेज पाटील यांनी गांधी मैदान या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत सभेच्या नियोजना संदर्भात माहिती घेतली.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची उद्या शनिवारी दुपारी एक वाजता गांधी मैदान येथे ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी गांधी मैदान या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली
काँग्रेससह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी तसचं कार्यकर्ते सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
याआधी गांधी कुटुंबातील इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या जाहीर सभा कोल्हापुरात झाल्या आहेत. राहुल गांधी हेही प्रचार आणि इतर कार्यक्रमांसाठी तीनवेळा कोल्हापुरात आले आहेत. प्रियांका गांधी मात्र पहिल्यांदाच जाहीर सभेसाठी कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या सभेच्या नियोजना संदर्भात आमदार सतेज पाटील यांनी गांधी मैदान या ठिकाणी, महाविकास आघाडी मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत, पाहणी करून चर्चा केली.सभेला येणाऱ्यांची बैठक व्यवस्था, सभेच्या ठिकाणी येणारी वाहनांच पार्किंग व्यवस्था, याची माहितीही त्यांनी घेतली. आप आपल्या मतदार संघातील प्रभागातील लोकांना सभेला घेऊन या. कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने या सभेला उपस्थित राहून, ही निर्णायक सभा यशस्वी करावी.अस आवाहनही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम. सतेज पाटील यांनी यावेळी केल. प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे, कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विजय देवणे, आर के पोवार, रवीकिरण इंगवले, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी उपमहापौर विक्रम जरग, भूपाल शेटे माजी नगरसेवक तोफिक मुलांनी, सचिन पाटील, अजय इंगवले, ईश्वर परमार, इंद्रजीत बोंद्रे, प्रताप जाधव,दुर्वास कदम, यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.