*पाच वर्षे सत्तेत नसतानाही जनतेसोबत असणाऱ्या अमल महाडिक यांना संधी द्या – सौ. शौमिका महाडिक*
कोल्हापूर – दक्षिण विधानसभा मतदारसंघातून २०१४ -२०१९ या काळात अमल महाडिक यांनी लोककल्याणाची अनेक कामे केली. त्यानंतर देखील पुढची पाच वर्षे सत्तेत नसूनही ते अविरत इथल्या नागरिकांसाठी झटत आहेत. प्रामाणिक पणे काम करत आहेत. विधायक कामांसाठी त्यांना संधी द्या, असे आवाहन गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी केले.
बालाजी पार्क येथे आयोजित मिसळ पे चर्चा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. “अमल यांनी गेल्या पाच वर्षात हातात कोणतेही पद नसताना शेकडो कोटींचा निधी आणला आहे. त्यातून विकासात्मक कामे केली आहेत. नागरिकांच्या मनातील त्यांचा आदर वाढला आहे. त्यांना जो नेता हवा आहे. तो अमल महाडिकच आहेत असा लोकांचा विश्वास आता पक्का झाला आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता त्यांना मत द्या असे त्या यावेळी म्हणाल्या. .
महायुती सरकार हे जनकल्याणाचे काम करते आहे. सरकारची लोकप्रियता दिवसागणिक वाढते आहे. त्यामुळे आता राज्यातील चित्र स्पष्ट झाले आहे. पुढील पाच वर्षात महाराष्ट्र राज्य विकासाच्या एका उच्चपातळीवर असेल, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुलींना मोफत शिक्षण, बस तिकिटात ५०% सूट, २५ हजार महिला पोलिसांची भरती, विश्वकर्मा योजना, वीज बिल माफी हे सर्व निर्णय सामान्य जनतेसाठी घेतलेले निर्णय आहेत. हीच सरकारची व अमल महाडिक यांची ताकद आहे, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे नियोजन सयाजी काटकर, मनोज नलवडे, सचिन गायकवाड यांनी केले. यावेळी गायत्री बलवडे, वर्षा नलवडे, उर्मिला दाभोळे, उर्मिला सुतार, वैशाली कांबळे, वैष्णवी नाईक, संजीवनी चौगले, नंदा जगदाळे, प्रवीण नलवडे, राकेश तुपारे, कुलदीप चौगले, किरण पोतदार, अजय चिले यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
*चौकट*
*शिवानी च्या शिक्षणाला शौमिका महाडिक यांचा आधार*
या परिसरात शिवानी पांडुरंग पाटील ही तरुणी चहाच्या गाड्यावर आपल्या आईसोबत काम करते. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असताना अत्यंत कष्टाने चहाच्या गाड्यावर काम करत ती आपले शिक्षण घेते आहे. ती वाणिज्य शाखेत दुसऱ्या वर्षात शिकते आहे. सौ. महाडिक यांनी तिची भेट घेतली. तिच्या संघर्षाची माहिती घेतल्यावर त्यांनी इथून पुढे तिच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा शब्द दिला. तिच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली.