यंदा दक्षिण मध्ये परिवर्तन नक्की* : सौ शौमिका महाडिक

Spread the news

*यंदा दक्षिण मध्ये परिवर्तन नक्की* :
सौ शौमिका महाडिक

कोल्हापूर :
दक्षिण विधानसभा मतदार संघातील जनता ऋतुराज पाटलांच्या कामाला व आश्वासनाला कंटाळली आहे गेली पाच वर्ष विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे त्यामुळे यंदा दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन नक्की आहे असे प्रतिपादन गोकुळ संचालिका सौ शौमिका महाडिक यांनी केले.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ नागाव येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी नागाव गावातील लोक प्रचंड मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
त्या म्हणाल्या, महायुती सरकारने आजवर अनेक योजना राबवल्या. या योजना राबवताना त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांचा विचार केला. युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, अंगणवाडी सेविका अशा सर्वांनाच त्यांनी न्याय मिळवून दिला.
नागाव गावात सभेसाठी उपस्थित जनसमुदायाला पाहून त्या म्हणाल्या, जनतेच खूप प्रेम महाडिक परिवाराला नेहमीच मिळालं आहे. तुम्ही सगळेच आमच्या पाठीशी कायम असता. याच उत्तम उदाहरण म्हणजे आज नागाव गावात तुम्ही अमल महाडिक यांच्या प्रचार सभेसाठी केलेली ही गर्दी आणि मला माहित आहे इथे कुणालाही काही देऊन आणलेले नाही. इथे जेवणावळीही घातल्या जाणार नाहीत. तरीही मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित आहात. आपल्या सर्व मतदारांचा हा प्रचंड प्रतिसाद माझी ऊर्जा वाढवणारा आहे, अशा भावना गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी व्यक्त केल्या.
या सभेप्रसंगी कृष्णराज महाडीक, शेतकरी संघटनेचे नेते प्रा. जालिंदर पाटील, ग्रीष्मा महाडिक, सुवर्णा महाडिक, रंगराव तोरस्कर सर, माजी सरपंच संगीता मगदूम, अण्णासो कोराणे, सात्ताप्पा पवार तानाजी राणगे, चेतना कांबळे, तुकाराम बोडके सर, पवन शेटे, बिपिन पाटील, भगवान कोराणे, किरण पोवार, चेतन पाटील, प्रमोद अतिग्रे, सुभाष कांबळे, विनायक सरदेसाई, सदाशिव मगदूम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते, गावातील युवा वर्ग, ग्रामस्थ बंधू भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

*दक्षिणमध्ये भगव वादळ निश्चित*
नागावमध्ये आल्यावर बिरदेवाचे दर्शन घेतले. तिथला भंडारा लागला.
अंबाबाईचे दर्शन घेतले तिथलं कुंकू लागलं आणि इथे आल्यानंतर पहिल्यांदा इथला गुलाल लागला. हा एक शुभसंकेत आहे.
कोल्हापूर दक्षिणामध्ये वादळ येणार हे निश्चित असल्याचा निश्चय गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!