काँग्रेसने भारतीय संविधानाची मोडतोड
नितीन गडकरी यांचा टोला
राहूल आवाडेंना विजयी करण्याचे आवाहन
कोल्हापूर –
स्वार्थासाठी आणिबाणीच्या काळात काँग्रेसने भारतीय संविधानाची मोडतोड केली. अन् आता संविधानावरुन भाजपावर बेछुट आरोप केले जात आहेत. पण संविधान बदलण्याची धमक कोणात नाही आणि आम्ही ते कोणाला करु देणार नाही, असा घणाघात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इचलकरंजी येथील जाहीर सभेत केला.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी बोलत होते
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी बोलत होते.
नामदार गडकरी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचयातीपासून संसदेपर्यंत सर्वाधिक काळ काँग्रेसचीच सत्ता होती. मात्र देशाची गरिबी हटली नाही आणि विकासही झाला नाही. पण, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची गरिबी जरूर हटली. काँग्रेसने देशात फक्त जातीयवादाचे आणि सांप्रदायिकतेचे विष कालविण्याचे काम केले आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना ही भाजपने सुरू केली. देशातील जवळपास साडेतीन लाख गावांना सर्वप्रथम पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी पक्क्या रस्त्यांनी जोडले. गरीबी, भुकमरी, बेरोजगारी ही आपली समस्या आहे. आज शेतकर्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. गावातल्या तरुण मुलांच्या हाताला काम नाही, कृषी पंप आहे पण वीज नाही, अशी स्थिती आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी व देशाच्या, राज्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपला सहकार्य करा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले.
भाजपने देशात कृषी सिंचन योजना आणली. केंद्र सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्रात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आली आहे. शेतकर्यांना अन्नदाता नाही तर ऊर्जादाता म्हणून पुढे आणून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर व गाव विकासाला चालना देण्याचे काम भाजपा सरकारच्या 10 वर्षांच्या काळात झाले. ही सरकारची सर्वात मोठी उपलब्धता आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणल्याशिवाय शेतकर्यांच्या समस्या दूर् होणार नाहीत. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार व उत्पादन कसे मिळेल, यावर भर दिला पाहिजे. आज पेट्रोल व डिझेलवर आपल्या देशाचे 22 लाख कोटी रुपये खर्च होतात. त्याला पर्याय म्हणून आपल्या देशात इंधन निर्मिती करणे आवर्यक आहे. त्या दृष्टिकोनातून इथेनॉल, बायोगॅस, सीएनजी हे प्रकल्प राबविणे काळाची गरज आहे. लवकरच देशात इथेनॉलचे 400 पंप इंडियन ऑईल उभारणार असल्याचे सांगत बायोगॅस निर्मितीवरही उभारण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणात जनता मालक तर लोकप्रतिनिधी सेवक आहे. म्हणून आपण लोकांची सेवा करायची आहे. त्यांचे जीवन सुसह्य करायचे आहे. येथील आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलायची आहे. गाव, गरीब, मंजूर, शेतकर्यांचे कल्याण करायचे आहे. जेव्हा विकासावर बोलता येत नाही तेंव्हा लोकांना कन्फ्युज करण्याचे काम केले जाते. दलित व मुस्लिम समाजात संभ्रम व भिती निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. त्याला बळी पडू नका असे आवाहन नामदार गडकरी यांनी केले.
आमदार प्रकाश आवाडे यांनी, देशात व राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. गतीने विकास सुरु आहे. इचलकरंजी शहर हायटेक बनत चालले असून याठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधांसाठीच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. औद्योगिक प्रगती वेगाने होत असून वीजेची कमतरता भासत आहे. एक्स्पोर्टसाठी कंटेनर डेपोची गरज असून याठिकाणी डिस्पॅच सेंटर सुरु करण्याची गरज व्यक्त केली. इचलकरंजीत दररोज 4 कोटी मीटर कापडाची निर्मिती होते. त्यापैकी दीड कोटी मीटर कापड हे हायटेक लूमवर होते. अन् हे सर्व कापड ब्रॅण्डेड कंपन्यांकडे जाते. म्हणूनच इचलकरंजी मार्केटींग सेंटरला जोडली जावी. टोयोटा कंपनीच्या माध्यमातून इचलकरंजी परिसरात हायटेक लूमची निर्मिती करण्याची व कबनूरात उड्डाणपूल बांधण्याची आणि उद्योगाला सोलर पॉवर देण्याची मागणी केली.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, मी आणि प्रकाश आवाडे यांच्या चार दशकांचा अनुभव राहुल आवाडे यांच्या पाठीशी असल्याने मतदारसंघातील कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही. पंचगंगा प्रदुषणमुक्ती, पंचगंगा घाट सुशोभिकरण, वीज सवलत, तरुणांच्या हाताला काम आदी कामे गतीने मार्गी लागतील. पण विरोधकांकडून आता बुध्दिभेद आणि घराणेशाहीचा आरोप केला जाईल, पण त्याकडे लक्ष न देता सर्वांगिण विकासाचे भविष्य घडविणार्या या निवडणूकीत राहुल आवाडे यांना विक्रमी अशा मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
खासदार धैर्यशील माने यांनी, राहुल यांना शहापूरचा म्हसोबाचा आणि विजयाचा गुलाल लागला आहे. इचलकरंजी हे अहोरात्र कष्ट करणारे शहर असून औद्योगिक प्रगती वेगाने होत चालली आहे. मेड इंडियाचा पाया हा इचलकरंजीतूनच रोवला गेला आहे. आवाडे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होतोय. पण घराणेशाही म्हणून नव्हे तर विकासाचा दृष्टीकोन