कागलमध्ये भाकरी करपण्या आधीच परतवा : माजी आम.मालोजीराजे यांचे आवाहन……… लाल दिव्याच्या हव्यासापोटी पालकमंत्र्यांनी निष्ठा विकली : राजे समरजितसिंह घाटगे…….

Spread the news

कागलमध्ये भाकरी करपण्या आधीच परतवा : माजी आम.मालोजीराजे यांचे आवाहन………

लाल दिव्याच्या हव्यासापोटी पालकमंत्र्यांनी निष्ठा विकली : राजे समरजितसिंह घाटगे…….

मुश्रीफांनी आयुष्यभर विश्वासघाताचे राजकारण केले : स्वाती कोरी………..

गिजवणे येथील महाविकास आघाडीच्या प्रचारसभेस रेकॉर्डब्रेक प्रतिसाद……..

 

गडहिंग्लज / प्रतिनिधी

कागल येथील पंचतारांकित आणि गडहिंग्लज औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून एकही नवीन मोठी कंपनी, उद्योगधंदा आलेला नाही.याचा परिणाम म्हणजे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे अगोदरच मतदारसंघात वाढलेली ” खोके संस्कृती ” मोडीत काढण्यासाठी आणि जनसामान्यांना अपेक्षित असणाऱ्या विकासकामांसाठी कागलमध्ये भाकरी करपण्या आधीच परतवा असे आवाहन माजी आम.श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांनी केले.
गिजवणे (ता.गडहिंग्लज) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील (खातेदार) होते.
छत्रपती मालोजीराजे पुढे म्हणाले, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे या तालुक्याच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे.आज त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत अत्यंत उच्च विद्याविभूषित असणारे त्यांचे चिरंजीव राजे समरजितसिंह घाटगे काम करीत आहेत.त्यांच्याकडे विकासाची चांगली दूरदृष्टी आहे. कोणतेही पद नसताना देखील या मतदारसंघातील जनतेसाठी त्यांनी मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे येत्या काळात अत्यंत अभ्यासू पद्धतीने तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भावी पिढ्या सुसंस्कृत बनविण्यासाठी त्यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, केवळ लाल दिव्याच्या हव्यासापोटी निष्ठा विकणारे पालकमंत्री आज मतदारसंघात प्रामाणिकतेच्या, नैतिकतेच्या आणि विकासकामांच्या गप्पा मारत आहेत हे या तालुक्याचे प्रचंड मोठं दुर्दैव आहे .याचा सुज्ञ मतदारांनी आता विचार करावा. माजी आम. श्रीपतराव शिंदे यांच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसात त्यांचा जनता दल पक्ष फोडणाऱ्या पालकमंत्र्यांच्या गद्दारीला काढण्याची हीच योग्य वेळ आली असल्याचे सांगितले.

यावेळी जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी म्हणाल्या,मुश्रीफांनी आयुष्यभर विश्वासघाताचे राजकारण केले.त्यांनी पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याने त्यांच्या मागे ” ईडी “चा ससेमीरा होता. तो चुकविण्यासाठी आणि ईडी पासून स्वतःची सुटका होण्यासाठी स्वाभिमानी जनतेला धोका देऊन ते जातीयवादी पक्षात गेले.आपल्या देव-देवतांच्या मंदिरांमध्ये देखील टक्केवारी खाणाऱ्या पालकमंत्र्यांना या निवडणुकीत पराभूत करा असे आवाहनही त्यांनी केले.

अमर चव्हाण,सुनील शिंत्रे,ॲड.सुरेश कुराडे,बाबासाहेब पाटील (खातेदार) यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवाजीराव खोत, शिवानंद माळी, गणपतराव गोणुगडे,बाळासो मोरे, उदयदादा कदम,रामगोंडा काळे, बसवराज आजरी, रवींद्र घोरपडे, सुजित देसाई ,अमृत पाटील, धनाजी पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक सौ.सुनंदा पोटजाळे यांनी केले.आभार सुरेश चव्हाण यांनी मानले तर सुत्रसंचलन प्रा.एम.बी.दळवी यांनी केले…

 

चौकट———-

पालकमंत्र्यांचा दांडगा भ्रष्टाचार ——-

धरणग्रस्त नेते शिवाजी गुरव म्हणाले,पालकमंत्री मुश्रीफ यांनी सात हजार कोटींच्या विकासकामांच्या पुस्तकाचे एक आदर्श ग्रंथ वाटप करत असल्याच्या अविर्भावात त्यांनी वितरण केले. मात्र या पुस्तकामध्ये त्यांच्या भ्रष्ट कामांशिवाय एकही काम नाही. विशेष म्हणजे निधी उचललेल्या मात्र प्रत्यक्षात ती कामेच न झालेल्या अनेक कामांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे त्यांचा “दांडगा भ्रष्टाचार” या पुस्तकातून मतदारांना समजलेला असून हे पुस्तकच त्यांचा पराभव करणार……

 

23 तारखेला क्रांती घडवा……

ऐनापुरचे माजी सरपंच ॲड.दिग्विजय कुराडे म्हणाले, दिवंगत कुपेकर साहेबांच्या काळात गडहिंग्लजसह या मतदारसंघाला एक आदर्शवत वैचारिक राजकीय संस्कृती होती.मात्र 2009 पासून येथील संस्कृतीच उध्वस्त झालेली आहे.याला सर्वस्वी जबाबदार पालकमंत्री मुश्रीफ आहेत.गावागावात भांडणं लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे पाप पालकमंत्री करत असल्याचे सांगितले. मात्र खबरदार, जर आमच्या ऐनापुर गावाकडे वाकड्या नजरेने तुम्ही बघाल तर,गाठ आमच्याशी आहे असे सांगत गडहिंग्लज तालुक्याला दूषित करणाऱ्या या पालकमंत्र्यांना येत्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा आणि येत्या 23 तारखेला राजेंना मतदान करून क्रांती घडवा असे आवाहन केले….

 

छायाचित्र —————–

गिजवणे (ता.गडहिंग्लज) येथील महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलताना मालोजीराजे छत्रपती,राजे समरजितसिंह घाटगे, समोर उपस्थित जनसमुदाय…….


Spread the news

You may also like

error: Content is protected !!