गांधीनगरमध्ये दर्जात्मक सुधारणासोबत बहुस्तरीय पार्किंगची व्यवस्था करणार – अमल महाडिक*

Spread the news

*गांधीनगरमध्ये दर्जात्मक सुधारणासोबत बहुस्तरीय पार्किंगची व्यवस्था करणार – अमल महाडिक*

कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रातील मोठी व्यापार पेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. देशभरातून लोक इथे खरेदीसाठी येत असतात. मात्र येथे असणाऱ्या मूलभूत समस्यांमुळे बराच त्रास सहन करावा लागतो आहे. येणाऱ्या काळात इथे दर्जात्मक मूलभूत सुविधा पुरवून परिसरामध्ये दर्जात्मक सुधारणार करणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांनी केले.

गांधीनगर येथे आयोजित गाठी – भेटी दरम्यान ते बोलत होते.
“या परिसरात स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी मंजूर झालेल्या अमृत जल योजनेची अमल बजावणी करणे. तसेच सांडपाणी व्यवस्थापन करण्याला प्राधान्य मी देणार आहे. येथील व्यापाऱ्यांच्या गोडाऊनच्या समस्यांचे प्रश्न देखील माझ्या कानावर आहेत. शिवाय इतर पायाभूत सुविधा उभ्या करून इथल्या नागरिकांच्या जीवनशैलीचा दर्जा सुधारण्यावर माझा भर असणार आहे.” असे ते यावेळी म्हणाले.

“येणाऱ्या २५ वर्षांचे नियोजन करून त्याचा एक आराखडा करणार आहे. आजवर या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आलो आहे. त्यामाध्यमातूनच काही निरीक्षण केलेले आहे. यातून काही प्रमुख कारणांचा मागोवा घेतला आहे. त्यामुळे आता या समस्या मुळापासून सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे शक्य होणार आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

“दिवाळी, दसरा या प्रमुख सणांसह लग्न समारंभाच्या हंगामात तसेच वर्षभर देखील येथे नागरिकांची वर्दळ असते. वाहतूक कोंडीचा प्रश्न तर नित्याचा झाला आहे. यासाठी बहुस्तरीय पार्किंग व्यवस्था उभी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आपल्या मतदारसंघातील या भागात राज्यभरातून नागरिक भेटी देतात याचे कौतुक आहे. यापुढे जेव्हा नागरिक येथील तेव्हा हा परिसर बघून त्यांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव नसतील तर ते आनंदी चेहऱ्याने सर्वत्र फिरतील याची खात्री देतो.” असे त्यांनी यावेळी नागरिकांना सांगितले.

२० नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून मला मत द्या. महायुती सरकारच्या विकासात्मक धोरणांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगतीच्या ज्या वाटेवर आहे, त्याच वाटेवरून आपण चालूया. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पदयात्रेला गांधीनगर मधील बीएसएस ग्रुप भागातील भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!