तारदाळ भागात मदन कारंडे यांना प्रचंड प्रतिसाद
बोला राम कृष्ण हरी, वाजवा तुतारीचा निनाद
इचलकरंजी : तारदाळ तालुका हातकणंगले येथे श्रीकांत मंदिर येथे दर्शन घेत श्रीफळ वाढवून पदवी यात्रेला सुरुवात करण्यात आली. पदयात्रेदरम्यान, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राम कृष्ण हरी वाजवा तुतारी या घोषात परिसर दणाणून सोडला. यावेळी महिलांनी कारंडे यांचे औक्षण करीत त्यांचे स्वागत करून त्यांना पाठिंबा दर्शवला.
मारुती मंदिर, गावभाग, विठ्ठल मंदिर ,ज्ञानेश्वर नगर ,माळभाग ,दसरा चौक, चांदनी चौक, जावईवाडी अशा परिसरातून ही पदयात्रा निघाली. चर्मकार समाजाचे बाळ खांडेकर , श्रीमती विभुते व विभुते परिवाराने मदत कारंडे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी यासीन मुजावर ,चंद्रकांत तांबवे ,नयन कांबळे , मालुताई चौगुले , अस्मिता तांबवे , सुरेखा कांबळे ,शिवलींग पाटील ,गजानन पाटील , पवन शिंदे , संजय तिवडे , विश्वनाथ मांजरे, भाऊसो चौगुले ,मुस्साली मुजावर , मनोज कांबळे ,उदय कोळी ,शिवाजी भुयेकर ,विशाल पवार , सुधाकर कदम , सतिश खोचरे , गजानन पाटील , गणेश पाटील , निलेश वाणी , विकास खोत , सर्वजीत भगत ,प्रविण जाधव , इरफान मुजावर , सचिन पाटील , आनंदा ग्वाडी, दत्ता सोनवले , अभिजीत चौगुले , सचिन भोसले , . सुनिल पाटील , सुनील शिंदे , संजय वास्कर , दगडू खोचरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने पदयात्रेत उपस्थित होते.