- *रेणुका भक्त संघटनेचा राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी *
कोल्हापूर, दि. 12 : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. गेली अनेक वर्षे खोळंबा आकार व एस.टी.भाडे याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात येत होती. परंतु, सन २००९ पासून या विषयी राजेश क्षीरसागर यांनी लक्ष घातले आणि खरोखरच एस.टी भाडे आणि खोळंबा आकार कमी करण्यात यशस्वी ठरले. सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर व्हावी यासाठी राजेश क्षीरसागर नेहमीच सदैव प्रयत्नशील असतात. यावर्षीही मार्गशीष पौर्णिमा आणि चैत्र्य पौर्णिमा यात्रेसाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या एस.टी. बसेसचा खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली काढण्यात आला असून, यात्रेस विशेष सवलत म्हणून खोळंबा आकार प्रतितास नाममात्र १० रुपये यासह प्रत्यक्ष चालविल्या जाणाऱ्या कि.मी.प्रमानेच भाडे आकारण्यास शासनाने मान्यता दिली. राजेश क्षीरसागर हे नेहमीच आई रेणुका भक्तांच्या पाठीशी उभे असल्याने या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी राहून आम्ही त्यांना विजयी करू, असे प्रतिपादन कोल्हापूर शहर रेणुकाभक्त संघटनेचे अध्यक्ष श्री.किरण मोरे यांनी केले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना कोल्हापूर शहर रेणुका भक्त संघटनेने जाहीर पाठींबा दिला.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष बिरूबळे यांनी, खोळंबा आकारासह भाडेवाढ हे प्रश्न मार्गी लावल्याने गाडीप्रमुखांवरील खर्चाचे ओझे कमी होते. भाविकांची यात्रा सुखदायी व्हावी यासाठी राजेश क्षीरसागर गेली १५ वर्षे काम करत आहेत. सौंदत्ती येथे ही भाविकांना सलग तीन दिवस मोफत अल्पोपहार, मोफत वैद्यकीय सेवा देवून रेणुका भक्तांची सेवा केली जाते. त्यामुळे आम्ही सर्व भक्तगण राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले.
यावेळी संघटनेचे प्रशांत खाडे, संजय मांगलेकर, श्रीकांत कारंदे, सुनील मोहिते, अनिल देवणे, बाबुराव पाटील, मंगला महाडिक, अनिता पोवार, प्रदीप साळोखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.