बदनामीचे जुने व्हिडीओ येतील, पण जनता माझ्या पाठीशी राहील : राजेश क्षीरसागर* मंगळवार पेठेतील प्रॅक्टीस क्लब चौकात कोपरा सभा

Spread the news

*बदनामीचे जुने व्हिडीओ येतील, पण जनता माझ्या पाठीशी राहील : राजेश क्षीरसागर*

मंगळवार पेठेतील प्रॅक्टीस क्लब चौकात कोपरा सभा

कोल्हापूर दि.१२ : केलेल्या सामाजिक, विकासकामांचा डोंगर पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकरने सहाजिकच आहे. पण, ज्याला पराभूत करता येत नाही त्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र आखल जात आणि तेच पुढच्या काळात होणार आहे. विरोधकांकडे नागरीकांना कोणत्या सुविधा देणार? शहर विकासासाठी काय करणार? हे मुद्देच नसल्याने बदनामीद्वारे जनतेत गैरसमज पसरविण्याचे काम जोरात केले जाते. त्यामुळे येत्या पाच – सहा दिवसात जुने व्हिडीओ काढले जातील. प्रसिद्धी माध्यमांवर शेअर करून बदनामी केली जाईल, पण जनतेने माझ्या पाठीशी रहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले.
मंगळवार पेठेतील प्रॅक्टीस क्लब चौकात कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कोपरा सभेस नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
ते पुढे म्हणाले कि, विरोधकांचा प्रचाराचा मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे बदनामी.. ज्या पद्धतीने कॉंग्रेसचे चिन्ह निवडणुकीतून गायब झाले आहे त्याच पद्धतीने विकासाचे मुद्देही त्यांच्या प्रचारातून गायब झाले आहेत. पराभव समोर दिसत असल्याने बदनामी करून जनतेत गैरसमज पसरविण्याचा एकमेव प्रचार विरोधक वापरतील. या सर्व व्हिडीओ बाबत मी माझ्या अहवालातून आधीच खुलासा केला असून, माझा अहवाल मतदारसंघाच्या प्रत्येक घरात पोहचल्यावर अशा व्हिडीओंना मतदार केराची टोपली दाखवतील, असा विश्वास व्यक्त केला. मी माझ्या आमदारकीच्या काळात तसेच राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून शहरात अनेक विकासकामे उभी केली. आपल्याकडे विकासकामांना सहकार्य करण्यापेक्षा विरोध करणारीच जास्त झाली आहेत. सामाजिक कार्य करत असताना विरोधक असावेत, पण त्यांच्या विरोधात प्रामाणिकपणा असावा. सत्य आणि तथ्य यासाठी विरोध व्हावा विरोधासाठी विरोध यामुळे कोल्हापूर मागे पडत असल्याचेही ते म्हणाले.
आगामी काळात विविध समाज माध्यमातून जुने फोटो, व्हिडिओ, भाषणे दाखवून माझी पुन्हा बदनामी करण्याचा प्रयत्न केला जाईल. सत्तेसाठी वाट्टेल ते करणारे विरोधक समाज माध्यमातून चुकीचे संदेश पसरवून अफवा पसरतील. लोकांनी यापासून सावध राहावे आणि अशा पोस्ट, संदेश आदींची खात्री करावी, असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, रणजीत जाधव, किशोर घाटगे, पवित्रा रांगणेकर, बाबा पार्टे, अनिल कोळेकर, गणेश देसाई, रणजीत मंडलिक, कुणाल शिंदे, रणजीत सासने, सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक, अविनाश कामते, दादा माने आदी उपस्थित होते.

*सुबराव गवळी तालीम मंडळ, मंगळवार पेठ यांचा जाहीर पाठींबा*
मंगळवार पेठेतील शाहूकालीन सुबराव गवळी तालीम मंडळ व कोल्हापुरातील सर्वात पहिल्या प्रॅक्टीस क्लबने महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना जाहीर पाठींबा दिला. यावेळी तालमीचे अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष संतोष महाडिक, मिलिंद गुरव, मानसिंग बुरटे, मंगेश सावेकर, बाळासो शेख, सर्जेराव कराळे, उदय पाटील, आप्पा मंडलिक, विनायक पाटील, संतोष माळी, सागर माळी, शुभम मस्कर, अभिजित पाटील, श्रीधर पाटील, बाळ मंडलिक, राहुल गुजर आदी तालमीचे संचालक मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!