*संविधान बदलणार या चुकीच्या प्रचाराला यावेळी मतदार फसणार नाहीत* – अमल महाडिक
कोल्हापूर / कंळबा – चंद्र सूर्य असेपर्यंत भारतीय राज्य घटना संविधान – राहणार या पंतप्रधानांच्या रोखठोक अशा भूमिकेमुळे आता विरोधकांना मोठी चपराकच बसली असून आगामी काळात त्यांच्या या चुकीच्या प्रचाराला मतदार मुळीच भीक घालणार नाही असा विश्वास कळंबा येथील सभेत बोलताना शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अत्यंत नियोजन पुर्वक संविधान – घटना बदलणार असा चुकीचा प्रचार करून आणि सामाजिक भीती निर्माण करून सामान्य जनता आणि मतदारांचा बुद्धिभेद करण्यात आला. काही प्रमाणात ते त्यामध्ये यशस्वी झाले असले तरी आता आगामी काळात येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये याची डाळ शिजणार नाही कारण मतदार जागृतपणे सर्व घडामोडी पाहत आहेत आणि यामध्ये आता पंतप्रधानांनी थेट सांगितल्यामुळे व पुन्हा एकदा थेटपणे घोषित केल्यामुळे या चर्चेचा पूर्णविराम मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले. कोल्हापूर दक्षिण या शहरी उपनगरातील आणि खेडेगावातील संमिश्र मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्यासाठी आपण गेली दहा वर्षे सहजतेने कार्यरत आहोत आणि या कामाची पोस्ट पावती म्हणून पुन्हा एकदा जनता माझ्यावर विश्वास ठेवेल.
यावेळी ज्येष्ठ नेते सदाभाऊ खोत यांनी सभेला संबंधित करताना समस्त महिला वर्गापासून ते युवा वर्गापर्यंत आणि गृहणी पासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक लोक योजना यशस्वीरित्या विद्यमान सरकारने राबवले आहेत त्या आगामी पाच वर्षात तितक्यात व्यापकतेने वापरण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आव्हाने त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी डॉक्टर सिद्धार्थ घोडेस्वार, संजय वास्कर, भिकाजी गाडगीळ, छाया मधुकर भवड, स्वरूप पाटील, उज्वला पाटोळे, बाजीराव पोवार, संभाजी पोवार (बावडेकर), सचिन कदम, प्रकाश पडळकर, महादेवराव खानविलकर, संदीप जाधव, प्रकाश कदम, सविता कांबळे, नामदेव पोवार, तानाजी पाटील, दिलीप पाटील, सचिन मगोरे कळंबा पंचक्रोशीतील नागरिक बंधू – भगिनी महायुतीचे स्थानिक सर्व पदाधिकारी उपस्थित होते