अमल महाडिक यांच्यासारख्या चांगल्या नेतृत्वाची दक्षिणेत गरज* – सदाभाऊ खोत

Spread the news

*अमल महाडिक यांच्यासारख्या चांगल्या नेतृत्वाची दक्षिणेत गरज* – सदाभाऊ खोत
कोल्हापूर :
गेल्या अडीच वर्षात महायुतीचे उमेदवार अमोल महाडिक यांनी सरकारच्या सर्व योजना समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविले आहेत. त्यामुळे अमल महाडिक यांच्यासारख्या चांगल्या नेतृत्वाची दक्षिणेत गरज आहे.
अमल महाडिक विविध योजनातील अनेक कामे नागरिकांच्या पर्यंत पोचवत आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, असे ठाम प्रतिपादन जेष्ठ नेते सदाभाऊ खोत यांनी केले.
कळंबा येथे महायुती पुरस्कृत भाजपा, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी गट, रिपाई महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
महायुतीचा नुकताच प्रसिद्ध झालेला जाहीरनामा आणि त्यामध्ये समस्त महिला वर्गांसह युवा वर्ग तसेच विशेषतः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजना आणि यापूर्वीच्या कामाची परिपूर्ती यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून ते आता कोणता तरी भावनिक मुद्दा पुढे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आपल्या पक्षाने केलेली कामे घेऊनच
घेऊन लाभार्थींसह सर्वांपर्यंत पोचवावीत, असे नमूद करत सदाभाऊ खोत यांनी गेले दहा वर्षे कोल्हापूर दक्षिण च्या शहरी आणि ग्रामीण भागातील मतदार संघात अमल महाडिक यांनी खासदार फंड असेल अथवा भाजपच्या माध्यमातून आपले सर्व कौशल्य पणाला लावून प्रचंड कामे केलेली आहेत आणि विशेष म्हणजे ते सहज कोणालाही कधीही उपलब्ध असतात. ते अनेकांना आपले घरचे वाटतात म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा आमदारकी देणे हे आता मतदारांनीच ठरवले आहे.
फक्त कार्यकर्त्यांनी अधिकाधिक टक्केवारीने मतदान होईल यासाठी आपली यंत्रणा कार्यरत ठेवावी असे ही शेवटी नमूद केले.
या सभेला डॉक्टर सिद्धार्थ घोडेस्वार, संजय वास्कर, भिकाजी गाडगीळ, छाया मधुकर भवड, स्वरूप पाटील, उज्वला पाटोळे, बाजीराव पोवार, संभाजी पोवार (बावडेकर), सचिन कदम, प्रकाश पडळकर, महादेवराव खानविलकर, संदीप जाधव, प्रकाश कदम, सविता कांबळे, नामदेव पोवार, तानाजी पाटील, दिलीप पाटील, सचिन मगोरे,
यासह पंचक्रोशीतील नागरिक तसेच विविध संस्था, संघटनेचे पदाधिकारी, तालीम संस्था, तरुण मंडळे, पदाधिकारी, युवा मंडळी, युवक कार्यकर्ते, यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्याच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कळंबा येथील ही सर्वात मोठी सभा झाल्याचे चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
डिजिटल बोर्ड लावून आपण अनेक कामे केल्याचा अवास्तव दावा करण्यापेक्षा गेली दहा वर्षे आपण सातत्याने कोल्हापूर दक्षिणच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहोत आणि जनतेसमोर हे आपले काम आहे त्यामुळे सुज्ञ मतदार जनता पुन्हा एकदा मला आमदारकीची जबाबदारी नक्कीच देईल असा विश्वास यावेळी उमेदवार अमल महाडिक यांनी व्यक्त केला .


Spread the news

You may also like

error: Content is protected !!