*युवकांच्या विकसित भविष्यासाठी हवे कर्तृत्ववान अमल महाडिक यांचे नेतृत्व – कृष्णराज महाडिक*
कोल्हापूर – “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे. महाराष्ट्रात अवघ्या अडीच वर्षात महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णयांच्या माध्यमातून विकासाचा उच्चांक गाठला आहे. तरुणांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे हे महायुती सरकार पुन्हा एकदा मताधिक्क्याने निवडून येणार आहे. कोल्हापूर मध्येही युवकांच्या विकसित भविष्यासाठी सदैव कार्यरत असणारे सुसंस्कृत, कर्तृत्ववान नेतृत्व अमल महाडिक सर्वाधिक मतांनी निवडून येणार आहेत, असा विश्वास युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.
लक्षतीर्थ वसाहत येथे आयोजित ‘मिसळ पे चर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आजघडीला देशातील युवकांची संख्या जगाच्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आपल्याकडे असणारी ही ताकद विधायक कामांसाठी वापरली तर देशाला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तरुणांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून महायुती सरकारने विधायक उपक्रम राबवले आहेत. यापुढेही एक कार्यशील जाहीरनामा घेऊन महायुती आपल्यासमोर आली आहे. युवकांची पसंती नेहमी पासून महायुतीसोबत आहे.” असे ते यावेळी म्हणाले.
कोल्हापूर मधील तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ही ऊर्जा सकारात्मक कामांकडे वळवली तर ते जागतिक पातळीवर नाव करू शकतात. या साठी त्यांना दिशा दाखवणारे व योग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून सोबत करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. अमल महाडिक यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहेत. शांत, सुस्वभावी, विनम्र, राजकारणापेक्षा समाजकारणात रस असणारे व त्यानुसार समाज सुधारणेसाठी कार्यरत असणारे अमल महाडिक हेच युवकांसाठी आदर्श आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
“कोल्हापूर मध्ये जास्तीत जास्त कंपन्यांनी गुंतवणूक करावी. येथील युवकांना योग्य वेतनासह रोजगार उपलब्ध व्हाव्यात. चांगल्या नोकऱ्यांसाठी त्यांना दुसऱ्या शहरांचे पर्याय शोधावे लागू नयेत. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था इथे उभ्या व्हाव्यात यासाठी महाडिक परिवार नेहमीच कार्यरत राहिला आहे. याशिवाय तरुणांच्या वैयक्तिक विकासासाठी सुद्धा काम केले आहे. केवळ आर्थिक नाही तर शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक विकासासाठी काम करणे हेच आमचे ध्येय आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी येत्या २० नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून तरुणांच्या विकासाला मत द्या, असे आवाहन केले. यावेळी सूरज साखरे, सचिन भोले, रत्नाकर पाटील, शुभम सूर्यवंशी, रुपेश पाटील, संदीप पाटील, गणेश लोहार, सोहम खाडे, शिवानी संजय पाटील, रमेश खाडे, ऋतुराज पुणेकर, ऋषिकेश लायकर, कॉर्नर ग्रुप महिला मंडळ, सुरज साखरे प्रेमी तरुण मंडळ आदींच्या सह महायुतीचे स्थानिक युवा पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.