पन्नास वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षात करुन दाखवले – जालिंदर पाटील चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ कसबा बीड परिसरात प्रचार दौरा

Spread the news

पन्नास वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
दोन वर्षात करुन दाखवले – जालिंदर पाटील
चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ कसबा बीड परिसरात प्रचार दौरा

: गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या कल्याणकारी योजनांव्दारे लाभ मिळवून दिला आहे. पन्नास वर्षात काँग्रेसला जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दोन वर्षात केले. उद्योगाच्या भरारीसाठी, करवीरमधील सामान्य जनतेच्या उन्नतीसाठी चंद्रदीप नरके यांना विक्रमी मतांनी मतदान करून विजयी करा असे आवाहन शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील यांनी केले.
माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ ते कसबा बीड येथे बोलत होते. यावेळी नरके यांनी करवीर तालुक्यातील घुंगूरवाडी, घानवडे, मांजरवाडी, चव्हाणवाडी, आरळे, गर्जन, चाफोडी, मांडरे, सावर्डे दु., सडोली दुमाला, हिरवडे दुमाला, सावरवाडी, शिरोली दुमाला, कसबा बीड, महे, कोगे या गावांचा प्रचार दौरा केला.
पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीची तीन राज्यात सरकारे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, आश्वासने दिली, आणि गॅरंटी दिली त्यापैकी एकही वचन पूर्ण केले नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरीब कुटूंबांना उभा करण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज बील माफी केली. पीएम किसान आणि नमो किसान योजनेव्दारे शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जात आहेत. कर्जमाफीचे रक्कमही या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली, संघटनेच्या अनेक अंदोलनांना न्याय दिला. चंद्रदीप नरके यांनी साखर कारखानदारीसाठी घेतलेले निर्णय दूरदृष्टीचे आहेत. त्यामुळे त्यांच्या सारख्या कर्तृत्ववान कार्यकर्ता आमदार पदावर असणे गरजचे आहे.
उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, माझी निष्ठा ही करवीर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्वसामान्य जनतेशी आहे. तीन वेळा विधानसभेची निवडून लढवली त्यावेळी माझे चिन्ह धनुष्यबाण व पक्ष शिवसेनाच होता आणि आत्ताही शिवसेनेमधूनच निवडणूक लढवत आहे. दोन वेळा विजयी झालो, एक वेळा पराभव झाला. पराभव होऊन सुद्धा थांबलो नाही, मतदारसंघामध्ये कधीही कोणालाही मी सहजपणी उपलब्ध असतो. स्वकर्तृत्वाने पुढे आलो आहे. विरोधकांनाही कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली होती ; पण स्वतःच्या मतदारसंघालाही ते न्याय देऊ शकले नाहीत. मी पद आणि प्रतिष्ठेसाठी लढत नाही. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व विकासासाठी विधानसभेच्या रणांगणात आहे. करवीरमधील सूज्ञ जनता माझ्या पाठीशी राहून मला पुन्हा एकदा आमदारकीची संधी देईल यात शंका नाही.
महायुती सरकाने लोककल्याणकारी योजनांची तातडीने अंमलबजावणी सुरु केल्यामुळे महिला, युवक व शेतकऱ्याची उन्नती साधली आहे. त्यामुळे विरोधक सैरभैर होऊन अफवा पसरवत आहेत. काँग्रेसने सत्तेच्या काळात साखर कारखान्याच्या आयकरचा प्रश्न सोडवला नाही. मोदी सरकारने राज्यातील सर्वच कारखान्याचा आयकर माफ केला. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांनादेखील झाला आहे. साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करण्याची मागणी मी केली होती. ती सरकारने मान्य केली. कारखाना अडचणीत असतांना सुद्धा दर दिला. मतदारसंघातील हजारो रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळवून दिली. त्यामुळे
आझाद क्रांती संघटनेचे मुकुंद पाटील म्हणाले, महायुती सरकारने विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे विधानसभेत चंद्रदीप नरके यांचा विजय निश्चित आहे.
यावेळी प्रताप पाटील, शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील, भाजपचे हंबीरराव पाटील, राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहूल खाडे, संचालक उत्तम वरुटे, किशोर पाटील, दादासो लाड, अनिल पाटील, अमित वरुटे, शैलेश वरुटे, पंडीत वरुटे यांनी केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!