तालुक्यात गुंडागर्दीचे राज्य येऊ नये यासाठी मला ताकद द्या नंदाताई बाबुळकर यांचे आवाहन
चंदगड
तालुक्यात गुंडागर्दीचे राज्य येऊ नये. स्व. बाबासाहेब कुपेकरांचे विचार आणि विकासाचा ध्यास घेऊन तुम्ही चालाल. बाबांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्याल, अशा भाबड्या आशेने कुपेकर गट तुमच्या पदरात घातला. त्या माझ्या कार्यकर्त्यांचाच घात करुन स्व. बाबांचे कार्यकर्ते पोरके झाले, असे उद्विग्न मत डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी जाहीर सभेत व्यक्त केले.
आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित परिवर्तन कॉर्नर सभेत दुंडगे, गडहिंग्लज येथे त्या बोलत होत्या. डॉ. बाभुळकर पुढे म्हणाल्या, मी पाच वर्षे कोठे होते, असा गैरसमज समाजात पसरविला जात आहे. मला राजकारणात कधीच यायच नव्हतं. पण तुमच्या या गद्दारीने मला ओढून आणले आहे. निष्ठेने बाबांनी हयात शरद पवार यांच्या सोबत दिली. या वयात त्यांच्या पाठित खंजीर खुपसलात. शरद पवार यांनी मला बोलावून घेऊन उमेदवारी दिली आहे. आणि सांगितलं, नंदा तुझा व्यवसाय बाजूला ठेव. राज्य संकटात आहे. स्व. बाबांच्या विचाराला कलंक लागला आहे. तू तुझ्या जन्मगावी ये. हा स्व. बाबांचा बालेकिल्ला आहे. तूच निवडणुकीला उभे राहायच आणि जिंकायचच. हा आदेश मानून मी, ही नित्तीमतेची लढाई जिंकण्यासाठी उभी आहे. या माझ्या जन्मभूमीत मी कायमची राहणार आहे.
शिवराज कॉलेजचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांनी विचारांच्या वारसदार डॉ. समृध्द नंदिनी बाभुळकर-कुपेकर असल्याचे सांगितले. काँग्रेसचे नेते विक्रमसिंह चव्हाण पाटील यांनी आपले आजोबा कै. व्ही. के. चव्हाण-पाटील यांनी काँग्रेस कधीच सोडली नाही. त्यामुळे काँग्रेस हा गोरगरीबाच्या भल्यासाठी काम करणारा पक्ष आहे. त्याची धोरणे आम्ही निष्ठेने चालवत असून चंदगड तालुका डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर यांना मताधिक्य देईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी रामराज कुपेकर, भिमगौंडा देसाई, किरण शिंदे, ओमकार घबाडे, विनायक संकपाळ, रवि नाईक, सुधीर तांबे, दत्ता पाटील, रवी देसाई, अविनाश मगदूम, निरंजन घबाडे, गणपती नाईक, संजय देसाई, दत्ता मगदूम, आण्णासाहेब पाटील, निरंजन घबाडे, अभिषेक खवरे, कपिल कोरी, कपील पाटील, रवि पाटील, राकेश पाटील आदींसह जनसमुदाय उपस्थित होता.