हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी आघाडी करणे हे न शोभणारे-विनोद तावडे

Spread the news

हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी आघाडी करणे हे न शोभणारे-विनोद तावडे
कोल्हापूर : ‘गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारण हे खूप वेगळया स्तरावर गेले. हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी आघाडी करणे हे न शोभणारे आहे.’ असा टोला भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस
विनोद तावडे यांनी लगाविला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ तावडे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सोमवारी सायंकाळी त्यांची पत्रकार परिषद झाली. याप्रसंगी
बोलताना तावडे यांनी, ‘विकसित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील
महायुतीला जनतेने घवघवीत यश द्यावे असे आवाहन केले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील तीनही प्रमुख पक्ष एकत्र
येऊन मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
तावडे म्हणाले, ‘सरकारकडून नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन स्वरुपात फायदे मिळतात. अप्रत्यक्ष स्वरुपातील फायद्यामध्ये
पायाभूत सुविधा, रेल्वे, रस्ते, मेट्रृो ट्रेन, विमानसेवा अशा सुविधांचा समावेश आहे. तर प्रत्यक्ष स्वरुपातील फायद्यांतर्गत लाभार्थ्यांना थेट
सुविधा मिळतात. लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा होणे, लखपती योजना, शेती वीज पंपाचे बिल शून्य
करणे अशा सुविधांचा समावेश आहे.
महायुती सरकारने राज्यातील जनतेला डोळयासमोर ठेवून कामकाज करताना प्रत्यक्षातील फायदे व अप्रत्यक्षातील फायदे या दोन्हींचा समतोला
साधला आहे. राज्यात मजबूत सरकार असेल तर प्रभावीपणे व चांगले काम करता येऊ शकते याच कारणासाठी राष्ट्रवादी अजित पवार
गटाला सरकारमध्ये सामील करुन घेतले. ज्या त्या वेळच्या राजकीय स्थितीवर उत्तर काढावी लागतात.’असेही तावडे म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासणीसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत यावर बोलताना तावडे यांनी
‘विमानतळावरील कर्मचारी नियमांचे पालन करत असतील तर कोणी त्याचा इगो करू नये. माझ्या ही बॅगांची तपासणी झाली.’असे उत्तर
दिले. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. युतीला बहुमत मिळाले. मात्र उद्धव ठाकरे यांनी केवळ
खुर्चीसाठी, हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेस सोबत आघाडी केली हे न शोभणारे होते.’असेही तावडे म्हणाले. पत्रकार परिषेदला भाजपा
प्रदेश सचिव विनोत तावडे, भाजपा महानगर अध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!