विनम्र, सुसंस्कृत, सर्वांच्या हक्काचे नेतृत्व अमल महाडिक – सौ. शौमिका महाडिक*

Spread the news

 

*विनम्र, सुसंस्कृत, सर्वांच्या हक्काचे नेतृत्व अमल महाडिक – सौ. शौमिका महाडिक*

कोल्हापूर – लोकप्रतिनिधी हा लोकांच्या कल्याणासाठी निवडून दिलेला असतो. त्याने त्यांच्या समस्या विधानभवनात मांडून त्या सोडवण्याचे काम करायचे असते. त्याने नम्र असणे गरजेचे असते. अमल महाडिक असेच विनम्र, सुसंस्कृत व सर्वांच्या हक्काचे नेतृत्त्व आहेत, असे प्रतिपादन गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी केले.

क्रांतिसिंह नाना पाटील नगर मधील श्री लॉन येथे आयोजित ‘मिसळ पे चर्चा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. “शहराच्या आसपास असणाऱ्या उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य देत असताना, इथल्या महिला वर्गाचे कष्ट कमी व्हावे यासाठी महाडिक प्रयत्न करणार आहेत. त्यांनी नेहमीच महिलांना सन्मानपूर्वक वागणूक दिली आहे.” असे त्या म्हणाल्या.

“महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे. सरकारने देखील महिलांना प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यभरातून सरकारला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. याबरोबरच महिलांना मोफत उच्च शिक्षण देत सरकार त्यांना सक्षम करण्यासाठी तत्पर आहे. आजवर कोणत्याच सरकारने घेतले नाहीत असे ऐतिहासिक निर्णय अवघ्या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने घेतले आहेत.” असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलत असताना माजी नगरसेवक मनीषा कुंभार यांनी महाडिक यांना अनुमोदन दिले. उपस्थित महिलांना त्यांनी २० नोव्हेंबर रोजी अमल महाडिक यांना मत देण्याचे आवाहन केले. “अमल यांनी भागातील नागरिकांसोबत संपर्क ठेवत नेहमी त्यांची विचारपूस केली आहे. त्यांच्यासारखे सुशील व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणून लाभणे हे आपले भाग्य आहे. लोकांसाठी अहोरात्र झटणारा हा लोकनेता आहे. यावेळी विजय त्यांचाच आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी नगरसेवक अमोल माने, राजू जाधव, सोनम खाडे, शोभा कोळी, योगेश वठारकर, प्रीती चिटणीस, चंद्रकांत माने, पप्पू आजरेकर व महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!