*वाडकर यांच्या आडून ऋतुराज यांची कोल्हेकुई – सुमित चौगुले*
कोल्हापूर : पाच वर्षात आपल्याला काही जमले नाही. विकासकामांच्या नावाखाली लोकांची केलेली फसवणूक आता सर्वांच्या लक्षात आली आहे. सर्वत्र ऋतू बदलाचे वारे वाहते आहे. त्यामुळे ज्या नावाची सकारात्मक चर्चा आहे. ते नाव बदनाम करून डाव साधण्यासाठी सुयोग वाडकर यांच्या आडून विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांची कोल्हेकुई सुरु आहे. अशी सडेतोड टीका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुमित चौगुले यांनी केले.
निगवे येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. “संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष या नात्याने, मी जबाबदारीने सांगतो, अमल महाडिक यांच्या सुचनेनुसार चालू वर्षातील मार्च ते ऑबरोबर या कालावधीत संबंधित व श्रावणबाळ योजनेसाठी आलेले सर्व अर्ज मंजूर केले आहेत. हे करत असताना वाडकर यांच्या सोबतींचे सुद्धा अर्ज पात्र ठरवले आहेत. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी महाडिक यांच्यावर “लोकांच्या चुलीत पाणी ओतले” अशी टीका करण्याआधी स्वतः खात्री करून घेणे गरजेचे होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या तोंडून खुद्द विद्यमान आमदार बोलत असल्याची प्रचिती येते आहे,” असा टोमणा त्यांनी यावेळी मारला.
“या काळात आम्ही ११४२ लाभार्थी पात्र केले आहेत. यावेळी आम्ही कोण काँग्रेस पक्षाला मानणारे आहेत व कोण नाहीत असा भेदभाव केला नाही. आमचे नेते महाडिक यांनी आम्हांला सुरुवातीलाच असे गटातटाचे राजकारण करू नका असे सांगितले होते. आपल्याला जनतेच्या कल्याणाला प्राधान्य द्यायचे आहे, असे त्यांचे नेहमीच म्हणणे असते. आम्हांला कुणाच्या चुलीत पाणी ओतायचेच असते तर आज विरोधी पक्षातील लोकांच्या चुली पेटल्याच नसत्या” असे ते यावेळी म्हणाले.
महाडिक यांच्या आदेशानुसारच आम्ही जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ दिला आहे. कमी कालावधी मिळूनही सर्वांपर्यंत ही योजना पोहोचवायचा प्रयत्न आम्ही केला आहे. आम्ही मंजूर केलेलीच पत्रे विरोधकांनी वाटली आहेत. ज्यांचा मोठा सोहळा करून आम्ही केले असे अवडंबर माजवले गेले. लोकांना आता सर्व कळते आहे. त्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ असणार आहेत. याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधून ठेवावी, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान असे खोटे नेतृत्व हटविण्यासाठी खंबीर, नेतृत्वकुशल अमल महाडिक यांना मत द्या , असे आवाहन त्यांनी केले.
या सभेसबनिगवे येथील ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील, सुमित चौगुले, प्रताप सिंह पाटील, (कावणेकर), संभाजी किल्लेदार, विलास बेडगे, सुशीला किल्लेदार,
किसान मोर्चा अध्यक्ष भगवानराव काटे, तेजस्विनी पाटील, शुभांगी पाटील, पल्लवी पाटील, बाबुराव पाटील, प्रवीण पाटील, कुलदीप तवंदकर, विनायक पाटील, तुषार पाटील, पायल शोंगामे, भारती किल्लेदार, तेजस्विनी शिंदे, यासह इतर मान्यवर महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.
*चौकट*
निगवे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हक्काचे पा टीव्हीणी पळवण्याचे हीन कृत्य बंटी पाटील यांनी केले आहे. त्यांचे हे पाप जनता कधीही विसरू शकत नाही.
*प्रताप पाटील कावणेकर*