महापुराच्या वेळी महाडिकानी वळिवडेकरांना वाऱ्यावर सोडले माजी उपसरपंच प्रल्हाद शिरोटे यांचा आरोप वळीवडेत ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ सभा

Spread the news

महापुराच्या वेळी महाडिकानी वळिवडेकरांना वाऱ्यावर सोडले

माजी उपसरपंच प्रल्हाद शिरोटे यांचा आरोप

वळीवडेत ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ सभा

कोल्हापूर
आमदार ऋतुराज पाटील यांच्यावर टीका करणारे महाडिक महापुराच्या वेळी वळीवडे ग्रामस्थ संकटात असताना कुठे होते? दहा घरे बांधून देण्याची आश्वासन देणाऱ्या महाडिकानी एक तरी घरी बांधून दिले का? महापुराच्या संकटात एक रुपयाचीही मदत न करता वळिवेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महाडिकान्यात जागा दाखवण्याची वेळ आली आहे असे मत माजी उपसरपंच प्रल्हाद शिरोटे यांनी व्यक्त केले.

आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ वळीवडे येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. शिरोटे म्हणाले, वळीवडे गावाला महापुराचा मोठा फटका बसला. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून गाव दत्तक घेऊन लोकांना आधार दिला गेला. तत्कालीन सरपंचाकडे 25 लाखाचा धनादेश दिला. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील संकटात असलेल्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी धावून आले. जनतेसाठी काही करायचे नाही आणि जे चांगले काम करतात त्यांच्यावर टीका करायची हीच महाडिक यांची पद्धत आहे.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, वळीवडे ग्रामस्थांचा वाढता पाठिंबाही माझ्या कामाची पोच पावती आहे. वीस तारखेला आपण मला भरभरून प्रतिसाद द्यावा.

यावेळी राजू वळीवडे, कपिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच रूपाली कुसाळे, उपसरपंच भैया इंगवले, सुहास खामगावे, मधुकर साळुंखे, बाजीराव माने, शरद नवले, विपुल दिगंबरे, चंद्रकांत पाटील, गणपती जाधव किशोर कुसाळे, अरविंद कुसाळे सचिन चौगुले, प्रकाश शिंदे, भगवान पळसे, महेश शेळके, रघु जगताप विजय चौगुले, राजाराम पवार, अर्जुन गायकवाड, सुधीर डोंगरे, कुलभूषण चौगुले, वैजनाथ गुरव, संजय कावळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!