ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांना पीएचडी जाहीर

Spread the news

 

ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांना पीएचडी जाहीर

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘जनसंवाद व वृत्तपत्रविद्या’ या विषयातील पीएचडी पदवी जाहीर झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे माजी कुलगुरू व माध्यम तज्ज्ञ डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला शोधप्रबंध सादर केला होता. ‘मराठी वृत्तपत्रांची अग्रलेखीय भूमिका व ग्रामीण विभागाबाबतचा दृष्टिकोन,’ हा पारेकर यांच्या संशोधनाचा विषय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दिनकर माने व शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा मुडे-पवार यांचेही त्यांना सहकार्य लाभले.
. . . .


Spread the news

You may also like

error: Content is protected !!