ज्येष्ठाचा आशीर्वाद, युवकात क्रेझ.. राहूलचं फक्त मोजा लिड
शिरोली दुमाला :
ज्या ज्या गावात राहूल प्रचारात जात आहे, तेथे ज्येष्ठांचा त्यांना आर्शीवाद मिळत आहे. सर्वात मिळून मिसळून स्वभाव आणि तरूणामध्ये असलेली क्रेझ यामुळे आता फक्त लिड मोजायचं… अशीच चर्चा करवीर मतदार संघात सुरू झाली आहे. करवीर मतदार संघात पी.एन. पाटील यांचा गावागावात भक्कम गट आहे. त्याला महाविकास आघाडीची ताकद मिळाली आहे. यामुळे आघाडीचे उमेदवार असलेल्या राहूल यांची मोठी हवा तयार झाली आहे. याच लाटेवर स्वार होत ते आता विजयी षटकार मारणार असल्याने मतदार संघात उत्सुकता आहे त्यांच्या मताधिक्याचीच.
शिरोली दुमाला, सांगरूळ, सडोली खालसा व या भागातील अनेक गावात काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.. या भागात विविध गावात झालेल्या राहूल यांच्या प्रचारासाठी सभेला तुफान गर्दी झाली. हा सभेत सर्वांनी राहूल यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला. दरम्यान, आतापर्यंत मी अनेक विधानसभा निवडणुका बघितल्या, मात्र यावेळी राहुल पाटील यांच्या विजयाचा सर्वांनीच चंग बांधल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. स्व. पी एन पाटील यांच्यावर प्रेम करणारे हजारो ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांचा आशीर्वाद राहुल पाटील यांना आहेच शिवाय राहुल पाटील यांच्याविषयी युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्रचंड उत्साहाने युवक प्रचारात सक्रिय आहेत. त्यामुळे राहुल पाटील याना या परिसरातून एवढे मोठे मताधिक्य मिळणार की, ते लीड कुठेच तुटणार नाही, असे प्रतिपादन गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी यांनी केले.
सांगरूळ व सडोली खालसा जि.प. मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी आबाजी यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात स्व.आम. पी एन पाटील यांनी भरीव असे कार्य केले. जुना सांगरूळ मतदारसंघ हा त्यांचा घरचा आहे. येथील जनतेचे त्यांच्याशी घनिष्ठ ऋणानुबंध आहेत. साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी पार पाडायला सर्वजण सज्ज असल्याचे सांगितले.
राहुल पी.पाटील म्हणाले, जुन्या सांगरुळ विधानसभा मतदारसंघाने प्रत्येक निवडणुकीत स्व.पी.एन. पाटील यांना भरभरून मताधिक्य दिले आहे. आपल्या सर्वांच्या साथीने हा स्नेहबंध असाच घट्ट ठेवायचा आहे. स्व. साहेबांनी कार्यकर्त्यांसाठी, जनतेच्या कामासाठी, विकासासाठी आपले आयुष्य पणाला लावले, याचे साक्षीदार आपण आहात. मोठ्या फरकाने या निवडणुकीत विजयी करा.
यावेळी अमर पाटील शिंगणापूरकर, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील, डी. के. पाटील, माजी जि.प.सदस्य सुभाष पाटील, शिरोली दुमाला सरपंच सचिन पाटील, चेतन पाटील, बुद्धीराज पाटील, माजी उपसभापती विजय भोसले यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील यांनी आभार मानले.
..अन कार्यकर्त्याला जीवदान मिळाले :
धोंडेवाडी येथील अर्जुन नलवडे यांना रात्रीच्यावेळी साप चावला, तोंडाला फेस येत होता. रात्री बारा वाजले असताना काही मंडळी थेट स्व.साहेबांच्या घरी गेले. साहेबांना घटना सांगताच त्यांनी क्षणात सीपीआर मधील डॉक्टरना फोन लावून मी दवाखान्यात येतोय,उपचार सुरू करा असे सांगताच रात्री घरी असणारे डॉक्टर दवाखान्यात तेवढ्याच घाईने आले व त्यांनी उपचार सुरू केले. साहेब स्वतः सिव्हिल ड्रेसवर दवाखान्यात पोहोचले. उपचार करून बाहेर येताच डॉक्टरनी, साहेब ज्या तळमळीने आपण फोन केला, स्वतः आलात त्यामुळेच आम्ही रात्री सुट्टीवर असताना हे काम केले. जरा देखील उशीर झाला असता तर वाईट घडले असते असे सांगितले. केवळ साहेबांमुळे कार्यकर्त्याला जीवदान मिळाल्याचा दाखला गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे यांनी दिला.
फोटो कॅप्शन : कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विश्वास पाटील आबाजी, राहुल पी.पाटील. समोर उपस्थित कार्यकर्ते.