नंदगावमध्ये बदलाचे नारे, सर्वत्र महायुतीचे वारे – अमल महाडिक*

Spread the news

*नंदगावमध्ये बदलाचे नारे, सर्वत्र महायुतीचे वारे – अमल महाडिक*

कोल्हापूर – गेली अनेक वर्षे नंदगाव वासियांसोबत माझे ऋणानुबंध आहेत. आपल्यामध्ये प्रेम व आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच आपल्या सर्वांच्या सुख दुःखाच्या प्रसंगात तुम्ही मला सहभागी करून घेत आहात. आपलेपणाने येथील दुरावस्थेची व्यथा सांगत असता. येथे बदलाचे नारे दिले जात आहेत आणि नक्कीच इथे महायुतीचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट होते आहे, अशी भूमिका कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांनी मंडळी.

येथील नंदगाव येथे आयोजित पद यात्रेदरम्यान ते बोलत होते. विद्यमान आमदारांच्या अकार्यक्षमतेमुळे भागातील नागरिकांची आबाळ झाली आहे. मूलभूत सुविधांसाठी देखील त्यांना सतत मागणी करावी लागते आहे. कच्चे रस्ते, सांडपाणी सुविधेचा अभाव यामुळे जगणे हैराण झाले आहे. या सर्वांला आता जनता उत्तर देणार आहे. व त्यांना घरी पाठवणार आहे. असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी गावातील महिला भगिनींसह, युवा व ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या परिसरातील समस्यांचे गाऱ्हाणे त्यांनी त्यांच्यासमोर मांडले. “महायुती सरकारच्या माध्यमातून महिला वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असेन. आपल्या साथीने हा लाडका भाऊ विकासाचा नवा टप्पा गाठेल. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी माझ्या कमळ या चिन्हांसमोरील बटण दाबून तुमचा आशीर्वाद द्या”, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  • याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रमेश चौगुले, ग्रामपंचायत सदस्य उमेश चौगुले, मारुती झांब्रे, अमर चौगुले, रणजीत पाटील, पैलवान किरण चौगुले, शामारव शिंदे, शाहू सहकारी साखर कारखान्यचे एम. आय चौगुले, उपसरपंच बाळासाहेब चौगुले, सामाजिक कार्यकर्ते दिलीप रेडेकर, ग्रामस्थ अमित संकपाळ, राहुल पाटील, मदन चौगुले, दीपक पाटील, नंदन ढवण, बाळासो रेडेकर, राजाराम चौगुले, विलास चव्हाण, दत्तात्रय साठे, तानाजी चौगुले, दत्तात्रय शेळके, रणजीत रेडेकर, विजय शिंदे तसेच साई तरुण मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ, जय हनुमान तरुण मंडळ, त्रिमूर्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!