इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी मला संधी द्या
मदन कारंडे यांचे आवाहन
इचलकरंजी : सण 2004 पासून मंत्र्यांच्या माध्यमातून नगरसेवक असतानाही आमदारांसारखी कामे मंजूर केली आहेत. त्यामुळे वारसा म्हणून नाही तर तीस वर्षाच्या कामातून, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच पक्षाने उमेदवारी दिली असून ही निवडणूक परिवर्तनाची विकासाची असल्याचा उल्लेख करत एक वेळ निवडून द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी केले.
सोलगे मळा पाण्याची टाकी येथून नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर ऋतुराज कॉलनी, मधुबन कॉलनी ,संजय गांधीनगर, मथुरा नगर अशा विविध ठिकाणी प्रचार यात्रा करून सोलगे मळा येथे प्रचार यात्रेतून कॉर्नर सभेत रूपांतर झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, 2008 मध्ये बारावी सीईटी परीक्षा द्यावी लागते. परंतु, या परीक्षेमध्ये दहा मिनिटं वेळ विद्यार्थ्यांना मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर मंत्री राजेश पाटील यांना भेटूया सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मंत्री टोपे यांनी परीक्षेला दहा मिनिटं वाढवून वेळ देत सुमारे सातशे रुपयांची फी माफ केली. त्यातून राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये वाचवण्याचे काम आपण केल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले. कॉर्नर सभेत काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल खंजीरे, माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव, माजी सभापती शुभांगी माळी, अजित मामा जाधव,उद्धव ठाकरे गटाचे सयाजी चव्हाण, कॉम्रेड जीवन कोळी, मलकारी लवटे, गणेश जाधव, प्रकाश मोरबाळे, नितीन कोकणे , माजी नगरसेविका सोनाबाई सोलगे, यशवंत झाडबुके, विलास कोकीटकर , संभाजी सूर्यवंशी, संजय सामानकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.