राजू माने यांचा भाजप प्रवेश त्यांच्या विकास कार्यासाठी सकारात्मक : महादेवराव महाडिक
उद्योजक राजू माने यांचा भाजप मध्ये प्रवेश
कोल्हापूर –
नेहमीच नव्या पिढीसाठी कार्यरत असणारे, युवाशक्ती आणि महिला सबलीकरण या दृष्टीने सातत्याने गतिमान असणारे राजू माने यांचा भाजप प्रवेश हा त्यांच्या या विकास कार्यासाठी सकारात्मक राहील. तसेच त्यांच्या भाजप प्रवेशाने त्यांना व्यापक स्वरूपातील व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, त्याचा ते नक्कीच सकारात्मक वापर करून घेतील, असा विश्वास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केला.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योजक राजू माने यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश पार पडला. यावेळी महाडिक यांच्या हस्ते राजू माने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपचे स्कार्फ गळ्यात घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
या उत्साही वातावरणात भाजप मध्ये प्रवेश केलेले राजू माने भारावून गेले. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, माझ्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील वाटचाल महाडिक परिवाराच्या आशीर्वादामुळे योग्य दिशेने सक्रिय झाली. माझ्या कामात महाडिक परिवारांचे नेहमीच सर्वतोपरी मार्गदर्शन मिळाले आहे. आता त्यांच्या बरोबरीने भाजपमध्ये काम करून अधिक गतिमानतेने मी पंचक्रोशीच्या विकासासाठी सक्रिय राहू.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त संजय दादा वास्कर, निवृत्त सुभेदार शिवाजी भोळे, कोल्हापूर भाजप सैनिक संघटनेचे कॅप्टन शिवाजी रुमाले, सुभेदार विजय भोसले, शिवाजीराव चव्हाण, सूभेदार रावसाहेब नटकुळे,.रतन आसबे, इनामदार चाचा उपरपंच चंद्रकांत पंडित, ग्रा. सदस्य बाबासो माने, अशोक लांडगे, पोपट नाईक, विनायक बागने, विलास कुंभार, संतोष माने, तानाजी चव्हाण, विलास कुंभार, प्रकाश मेटकरी, विकास यादव, आदित्य दळवी, संग्राम भजनावळे तसेच उजळाईवाडीतील सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी, युवा वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.