:करवीर मध्ये बुद्धीभेदाच्या राजकारणालाथारा देऊ नका
राहुल पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर :
करवीर विधानसभा मतदारसंघात दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवून विरोधकांकडून बुद्धीभेदाचे राजकारण केले जात असून महाविकास आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते आघाडी शी निष्ठावंत आहेत त्यामुळे या दिशाभूलीला थारा देऊ नका असे प्रतिपादन काँग्रेसचे उमेदवार राहुल पी एन पाटील यांनी केले.
दोनवडे (ता. करवीर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केदारनाथ समुहाचे संस्थापक व रयत सेवा संघाचे संचालक चिंतामण गुरव होते. स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी गावातील कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले असून हे स्वाभिमानी कार्यकर्ते पी एन पाटील यांच्याप्रमाणेच निष्ठावंत आहेत .ते कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाहीत केवळ हा फुटला तो फुटला असा देखावा करून विरोधक बुद्धीभेद करत आहेत त्यांना स्वाभिमानी कार्यकर्ते त्यांची जागा दाखवून देतील असे पाटील यांनी सांगितले
यावेळी आर. एम. पाटील म्हणाले, माझी दोन्ही मुले इतर पक्षात गेली हे मला त्यांनी सांगितले नव्हते. आमचे शंभर टक्के मतदान आपल्यालाच होईल असे आश्वासन त्यांनी दिले.
केदारनाथ समुहाचे संस्थापक चिंतामण गुरव म्हणाले, केदारनाथ समूह हा स्वर्गीय श्रीपतदादा बोंद्रे, पी एन पाटील सतेज पाटील या काँग्रेसच्या नेत्यांच्या अधिपत्त्याखाली चालत आला आहे त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत आता तो वारसा राहुल पाटील यांच्याकडे आला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू असे आश्वासन दिले.
एस. एम. पाटील म्हणाले, आमचा केदारनाथ समूह हा निष्ठावंत आहे आमच्या काही कार्यकर्त्यांना जेवणासाठी बोलवण्यात आले त्यावेळी फोटो काढून शिवसेनेत प्रवेश झाला अशी बतावणी करून फोटो व्हायरल करण्यात आले पण ते आमचेच कार्यकर्ते आहेत त्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिलेले नव्हती ही सद्यस्थिती आहे.
करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी मी काँग्रेस पक्ष सोडून गेलेलो नाही मी पक्षातच आहे. माझ्या बाबतही अफवा पसरवण्याचे काम विरोधकांनी केले असून राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे त्यांनी सांगितले
यावेळी गोकुळचे संचालक विश्वास नारायण पाटील, बाळासाहेब खाडे, केदारलिंग संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासो पाटील, माजी संचालक कृष्णात पोवाळकर, केदारनाथ सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष पांडुरंग श्रीपती पाटील, दत्तात्रय चौगले, संचालक राजाराम मगदूम, केदारनाथ विकास संस्थेचे संचालक शंकर मगदूम, सामाजिक कार्यकर्ते शहाजी पोवाळकर केदारलिंग दूध संस्थेचे संचालक कृष्णात खोंद्रे, केदारनाथ विकास संस्थेचे माजी संचालक काकासो गुरव, केदारलिंग दूध संस्थेचे संचालक पांडुरंग गुरव, महादेव बापू पाटील, बाजीराव पाटील-कोगेकर, पै. शहाजी पोवाळकर, केदारनाथ विकास संस्थेचे संचालक युवराज पाटील, माजी सरपंच सरदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक शिक्षक सदाशिव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रामदास पाटील यांनी केले. यावेळी एस एम पाटील, केदार गुरव यांची भाषणे झाली. यावेळी केदारलिंग विकास संस्थेचे संचालक बाबुराव मेंगाणे, राऊसो कळके, तसेच सुनिल गुरव, शरद कळके, युवराज पाटील, नितीन शिंदे, निलेश खोंद्रे, संदीप उर्फ संजय पाटील, प्रकाश खोंद्रे, अनिल यशवंत पाटील, अषिकेश पोवाळकर, अभिषेक पोवाळकर, अभिजित गुरव, विश्वजित कळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.