चंद्रदीप नरके साहेब धामणी प्रकल्पावर कधी एक पाटी माती तरी टाकली का? संदीप पाटील यांचा खडा सवाल

Spread the news

चंद्रदीप नरके साहेब धामणी प्रकल्पावर कधी एक पाटी माती तरी टाकली का?
संदीप पाटील यांचा खडा सवाल
बाजारभोगाव :
धामणी प्रकल्पासाठी स्वर्गीय आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी आपले राजकीय आयुष्य वेचले होते .हा प्रकल्प तांत्रिक अडचणीतून बाहेर काढून भरीव निधी देण्याबरोबरच प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी त्यांनी जिवाचे रान केले होते .मात्र माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधून घेतला होता .प्रकल्प पूर्णत्वाकडे आल्यावर ते त्याचे श्रेय लाटण्यास निघाले आहेत .नरके साहेब धामणी प्रकल्पासाठी कधी मातीची पाटी तरी टाकली होती काय असा खडा सवाल पाटपन्हाळा ता पन्हाळा चे माजी सरपंच संदीप पाटील यांनी केला.
करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल पी.पाटील यांच्या प्रचारार्थ बाजारभोगाव (ता.पन्हाळा) येथे आयोजित प्रचार दौऱ्या दरम्यान ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पन्हाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर होते. नरके हे केवळ पोस्टरबाज असून कुंभी कासारी साखर कारखान्या वर कर्जाचा डोंगर करून सभासद व कर्मचाऱ्यांचे वाटोळे केले आहे असा आरोप संदीप पाटील यांनी केला .
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके यांनीराहुल पाटील हे एकनिष्ठ व सुसंस्कृत उमेदवार आहेत .खोटी दिशाभूल करणाऱ्यांना करवीरची जनता थारा देणार नाही .राहुल पाटील यांचे विजयासाठी निष्ठावंतांची फौज कामाला लागली असून आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील आमची पाटील-नरके-पाटील आघाडी अभेद्य राहणार असल्याने यातून आम्ही निश्चितच जिल्ह्याचा विकास साधणार आहोत.
उमेदवार राहूल पी.पाटील म्हणाले, स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांनी आयुष्यभर सहकार राजकीय व सामाजिक क्षेत्रातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला .त्यांनी कधीही कोणाला फसवलेले नाही .माझ्या रक्तात त्यांच्याच निष्ठावंत विचारांचा आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा वसा आणि वारसा आहे.धामणी प्रकल्पाला स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांनी शेकडो कोटींचा निधी आणून प्रकल्पाचे काम सुरू केले आहे याची दखल धामणी खोऱ्यातील जनतेने घेतली आहे स्व.आमदार पी.एन.पाटील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत माझी वाटचाल सुरू असल्याने पन्हाळा तालुका आणि जांभळी खोऱ्यातील मतदारांनी मला आशीर्वाद द्यावा मी जन्मभर सेवेसाठी वचनबद्ध आहे असे सांगितले .
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे,पन्हाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर, करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी,दामोदर गुरव,नितीन हिर्डेकर, सलीम गडकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बळीराम पाटील,अनिल माळवी, अनिल पवार,सुरेश वाडेकर यांची भाषणे झाली
यावेळी सरपंच सीमा नितीन हिर्डेकर,गगनबावडा माजी सभापती बंकट थोडगे,केडीसीसी संचालिका श्रुतिका काटकर,शशिकांत आडनाईक,अर्जुन पाटील शहाजी चव्हाण पुनाळ,शाहू काटकर, रणजित पाटील,संदीप मगदूम, गणपतराव कांबळे, आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरुण तळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो
बाजार भोगाव येथील महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना संदीप पाटील व्यासपीठावर राहुल पाटील सडोलीकर बंकट थोडगे डॉ चेतन नरके जयसिंगराव हिर्डेकर व मान्यवर


Spread the news

You may also like

error: Content is protected !!