राहुल पाटील यांना पन्हाळ्यातून निर्णायक मताधिक्य देणार –विलास पाटील

Spread the news

राहुल पाटील यांना पन्हाळ्यातून निर्णायक मताधिक्य देणार –विलास पाटील
कळे
स्वर्गीय आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी अवघ्या पाच वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला होता .त्यांच्या पश्चात या मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद केवळ राहुल पाटील यांच्याकडेच असून चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे केवळ भूल थापा लावण्याचे काम केलेले आहे .त्यामुळे पन्हाळा तालुक्यातून राहुल पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत व विकासा चा दृष्टीकोन असणाऱ्या उमेदवाराला विजयी व निर्णायक मताधिक्य देऊअसे प्रतिपादन पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती विलास पाटील यांनी केले
कळे जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती . आपल्या भाषणात पुढे बोलताना त्यांनी मध्यंतरीच्या दहा वर्षात करवीरच्या जनतेने चंद्रदिप नरके यांना संधी दिली होती .मात्र त्यांनी मतदारसंघाच्या विकासाचे कोणतेही काम केले नाही त्यामुळे त्यांना आता मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही असे सांगितले .
यावेळी बोलताना करवीर चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघ भकास केला असून कुंभी कारखाना ही कर्जाच्या खाईत लोटला आहे हेच त्यांचे कर्तृत्व आहे .पी एन पाटील हेच धामणे प्रकल्पाचे खरे खरे शिल्पकार आहेत .मतदारसंघात गट न बघता त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता उभा केलेले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत राहुल पाटील यांचा विजय निश्चित आहे .कोणत्याही भूलथापांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी ताकतीने प्रचार करावा असे आवाहन केले .
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके यांनी अरुण नरके व स्वर्गीय पी एन पाटील यांच्या नसानसात निष्ठा ठासून भरलेली होती .त्यांनी खऱ्या अर्थाने विकासाचे काम केलेले आहे .या मतदारसंघात राहुल पाटील व आम्ही हातात हात घालून काम करत असून महाविकास आघाडी चे कार्यकर्ते राहुल पाटील यांच्याविजयासाठी रात्रीचा दिवस करतील त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे विजय निश्चित आहेअसे सांगितले .
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनीस्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी अवघ्या पाच वर्षात करवीर मतदार संघाचासर्वांगीण विकास केला असून धामणी प्रकल्पाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आगामी काळात हा मतदार संघ राज्यात आदर्श बनवण्यासाठी मी वचनबद्ध असून सर्वांनी भरघोस मताधिक्य देऊन आशीर्वाद द्यावा मी आजन्म आपला सेवक म्हणून कार्यरत राहील असे प्रतिपादन केले .
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मोळे, हंबीरराव चौगले शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश पोवार,विलास पाटील कळे, रणजित पाटील,ज्ञानदेव कांबळे काटेभोगाव,यांची भाषणे झाली.
यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,संभाजी पाटील(तात्या),बाळासाहेब मोळे,सुरेश पाटील , एस के पाटील ,पी.डी.पाटील,,सुनील पाटील,माजी सभापती बंकट थोडगे ,रणजित पाटील,शंभूराजे पाटील,शंकर राबाडे,बापू गिरीबुवा,शामराव पाटील,तसेच ए.डी.पाटील),रघुनाथ आवळेकर,,सरदार पाटील,केरबा पाटील,डॉ कोल्हे,अनिल पोवार,संदीप टिक्के,शिवाजी पाटील,कृष्णनाथ कदम,सीताराम सातपुते,बाळासाहेब खाडे,युवराज पाटील(सर),निवास पाटील(सर),सतीश मोळे,बाजीराव पाटील,किरण पाटील, मनोज पाटील,पांडुरंग जाधव यांच्यासह मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मनोज पाटील यांनी मानले
चौकट
काटे भोगाव येथे नरके गटाला खिंडार
काटेभोगाव येथील नरके गटाचे कार्यकर्ते ज्ञानदेव कांबळे प्रणिता कांबळे बाजीराव कांबळे
धिरज आंग्रे शशीकांत कांबळे
श्रीकांत कांबळे गजानन कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नरके गटाला रामराम ठोकूनकाँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे नरके गटाला खिंडार पडले असून मोठा धक्का बसला आहे

फोटो
कळे जिल्हा परिषद मतदार संघातील मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील डॉ चेतन नरके विलास पाटील व राजेंद्र सुर्यवंशी समोर उपस्थित जनसमुदाय


Spread the news

You may also like

error: Content is protected !!