Spread the news

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी आणि नॅशनल तैपेई युनिव्हर्सिटी, तैवान यांच्यात आंतरराष्ट्रीय सहकार्य करार

पुणे: ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व नॅशनल तैपेई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, तैवान यांच्या वतीने १३ ऑगस्ट २०२४ रोजी महत्त्वपूर्ण शैक्षणिक सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सहकार्य कराराबद्दल ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मानद सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले, “करारामुळे शैक्षणिक देवाणघेवाण तर होईलच, पण विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक आदान-प्रदानाचेही नवे दार उघडले जाईल. या सहकार्याद्वारे विद्यार्थ्यांचे गुण आणि कौशल्य अधिक खुलतील व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक प्रोत्साहन मिळेल.”
एआयएसएसएमएस संस्थेचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने व नॅशनल तैपेई युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. सिया-फ्यू वँग यांनी हा करार डिजिटल स्वाक्षरीद्वारे प्रमाणित केला, तर संपूर्ण करार प्रक्रियेचे समन्वय एआयएसएसएमएस आंतरराष्ट्रीय सहकार्य कक्षाच्या डीन, डॉ. मीनाक्षी ए. थालोर यांनी केले. आंतरराष्ट्रीय सहकार्य करारांतर्गत दोन्ही संस्थांमध्ये एकत्रित संशोधन प्रकल्प हाताळले जातील, ज्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांना नवनवीन संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील तसेच शैक्षणिक साहित्य, प्रकाशने, माहिती व मँडरिन भाषा संसाधने यांच्या सामायिक वापरामुळे विविध संकल्पांनाना वाव मिळेल. प्रत्येक सत्रात पाच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी होऊ शकतील ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षणाचा अनुभव घेता येईल. त्याचबरोबर, एकत्रित संशोधन उपक्रमांमधून नव्या तंत्रज्ञानाचा विकास होईल. दोन्ही संस्थांच्या सहकार्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील ज्ञान तसेच कौशल्य अजून प्रगल्भ होऊन, त्याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रातील नवीन संधींवर होईल.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!