नियम सर्वांसाठीच आहेत. त्यामुळं प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका;* *आमदार सतेज पाटील*

Spread the news

 

*नियम सर्वांसाठीच आहेत. त्यामुळं प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका;*
*आमदार सतेज पाटील*
*नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा*

*कोल्हापूर:* नियम सर्वांसाठीच आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका. नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करा. अशा सूचना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार सतेज पाटील बोलत होते.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासना सोबत, आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला, जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक,जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण,महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी,नियम सर्वांसाठीच आहेत. त्यामुळें प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळ काढू पणा करु नका. नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करा. अशा सूचना त्यांनी केल्या. दरम्यान यावेळी गडमुडशिंगी येथील श्री महालक्ष्मी सह. गृह निर्माण संस्थेची सुमारे, 15 एकर जमीन कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी संपादीत करण्यात येणार आहे. मात्र यामध्ये काही, कायदेशीर अडचणी असल्याने याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी, विमानतळ विस्तारीकरणासाठी या गृहनिर्माण संस्थेची जमीन संपादनाकरिता प्राधान्याने लक्ष घालून, प्रयत्न करावेत. अशा सूचनाही आमदार सतेज पाटील यांनी बैठकीत केल्या. दरम्यान करवीर तालुक्यातील वळीवडे, येथील नवीन बांधकाम परवाने आणि जमीन बिगरशेती परवाने थांबवण्यात आले आहेत. यातील काही तांत्रिक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवून, वळीवडे येथील नागरिकांना जमीन बिगर शेती परवाने देण्याबाबत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबतही आमदार सतेज पाटील यांनी बैठकीत सांगितले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील पुरवठा विभागांतर्गत आनंद शिधा वितरण व्यवस्थेचांही त्यांनी आढावा घेतला. याशिवाय हातकणंगले तालुक्यातील तासगांव, येथील गट नं. 41 मधून शेतकऱ्यांना 20 फुट पक्का रस्ता मिळणेबाबत आणि शाहूनगर येथील 66 घरांचे आणि यादवनगर, डोंबारवाडा येथील 32 घरांचे नियमानुकूल करणेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी विजय पोवार, महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश कांजर, सामाजिक विशेष तज्ञ युवराज जबडे आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!