स्मृतीदालनामध्ये शिवाजीराव सावंत यांना अभिवादन*

Spread the news

*स्मृतीदालनामध्ये शिवाजीराव सावंत यांना अभिवादन*

आजरा : येथील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृतीदालनामध्ये सावंत यांच्या स्मृतीदिनी बुधवारी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी, आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष रमेश कुरूणकर यांच्या हस्ते यावेळी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आजरा अर्बन बॅंकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. अनिल देशपांडे संचालिका शैला टोपले, अस्मिता सबनीस, आजरा ग्राहक संस्थेचे अध्यक्ष अनिकेत चराटी, सुनील सुतार, राजू दीक्षित यावेळी उपस्थित होते. आजरा कारखान्याचे माजी संचालक जनार्दन टोपले, आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, शाखा अभियंता एस. एस. नाईक, दीपक हर्णे यांच्यासह नागरिकांनी सावंत यांना अभिवादन केले.
निर्धार प्रतिष्ठानच्यावतीने विनय सबनीस आणि अॅड. सचिन इंजल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यासाठी आजरा पंचायत समितीचे सहकार्य लाभले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!