तीन लाखावर गणेशमुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन शंभर टक्के निर्माल्य पाण्याबाहेर, हिंदुत्ववादी कार्यकर्त्याकडून अटकाव

Spread the news

 

 

 

 

 

तीन लाखावर गणेशमुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

शंभर टक्के निर्माल्य पाण्याबाहेर, हिंदुत्ववादी कार्यकर्त्याकडून अटकाव

कोल्हापूर

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, टाळ्यांचा गजर करत भक्तीमय वातावरण जिल्ह्यात घरगुती गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. नदी, तलाव या ऐवजी विसर्जन कुंड, इराणी खण व गावागावात, गल्लोगल्ली ठेवलेल्या काईलमध्ये विसर्जन करत भक्तांनी पर्यावरण बचावचा संदेश दिला. दुसरीकडे  हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीतच मूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह धरत बॅरेकेट्स तोडल्याने तणाव निर्माण झाला. निर्माल्य शंभर टक्के पाण्याबाहेर साठवत प्रदुषण न करण्याची परंपरा कायम ठेवली. सुमारे तीन लाखावर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

पाच दिवसाच्या उत्सवानंतर सकाळपासूनच घरगुती गणेशाचे विसर्जन सुरू झाले. कोल्हापूर शहरात यावर्षीही पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणी 207 गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कुंडची व्यवस्था करण्यात आलेली होती. महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.  विसर्जनाच्या कामकाजासाठी अडीच हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. इराणी खण येथे मोठ्या प्रमाणात गणेशाचे विसर्जन सुरू होते. याशिवाय गल्लीबोळात ठेवलेल्या काईलमध्ये पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. नदी, तलाव, तळ्यांचे प्रदुषण टाळण्यासाठी निर्माल्यही एकत्र जमा करण्यात आले. कोल्हापूरकरांनी या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला.

दरम्यान, पंचगंगा नदीतच मूर्तीचे विसर्जन  करणार अशी भूमिका काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतली. पोलिसांनी नदी घाटाकडे जाता येऊ नये म्ह्णून मारलेले बॅरिकेट्स् त्यांनी तोडले. काही मूर्तींचे नदीत विसजन केले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!