”
माई ह्युंदाईमध्ये “द बोल्ड न्यू अल्कझार” चं लॉंचिंग संपन्न….
कोल्हापूर
अल्पावधीतच भारतीयांच्या पसंतीला उतरलेली “द बोल्ड न्यू अल्कझार” आता नव्या स्वरूपात ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. एलआयसीचे कोल्हापूर व कोकण विभागाचे सिनियर डिव्हिजनल मॅनेजर विवेक देशमुख, सेल्स मॅनेजर (एलआयसी) गजानन कोषटवार, ब्रँच मॅनेजर जहांगीर अत्तार यांच्या हस्ते नवीन अल्कझारचं अनावरण करण्यात आलं. “द बोल्ड न्यू अल्कझार” पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही प्रकारात 6 व 7 सीटर “द बोल्ड न्यू अल्कझार” उपलब्ध असेल, तसेच ही दोन्ही मॉडेल्स ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध असणार आहेत. यातील 6 सीटर मॉडेलच्या मधल्या सीट्स आता व्हेंटिलेटेड सीट्स असतील, जेणेकरून अधिक आरामदायी प्रवासाचा आनंद मिळेल. याशिवाय मधल्या सीट्सच्या हेडरेस्टना विंग्ज दिली आहेत, जेणेकरून पॅसेंजरला झोप लागली तर धक्क्याने मान हलू नये. यासोबत मध्ये बसणाऱ्या पॅसेंजर्ससाठी वायरलेस चार्जरची सुविधाही देण्यात आली आहे. “द बोल्ड न्यू अल्कझार” मध्ये पुढं बसणाऱ्या पॅसेंजर्सना त्यांच्या सोयीनुसार स्वतंत्र एसी देण्यात आला आहे. यामध्ये पॅसेंजर आपल्याला हवं ते टेम्परेचर सेट करू शकतात. या अल्कझारचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ड्रायव्हर सीटचं सेटींग मेमरीमध्ये सेव्ह करता येतं. म्हणजे आपल्याशिवाय दुसरं कोणी गाडी चालवत असतील तर पुन्हा आपण आपली सीट आपल्याला हवी तशी करता येते. “द बोल्ड न्यू अल्कझार” मध्ये “अडास लेव्हल 2” हे सुरक्षिततेविषयक फिचर देण्यात आलं आहे. म्हणजेच आराम आणि सुरक्षा यांची पुरेशी काळजी अल्कझारमध्ये घेण्यात आली आहे.
“द बोल्ड न्यू अल्कझार” तिच्या सेगमेंटमधली अत्यंत आरामदायी आणि सुरक्षित एसयूव्ही आहे. गणेशोत्सव तसेच आगामी सणासुदीच्या काळात नवीन अल्कझार तसंच ह्युंदाईच्या सर्व मॉडेल्सच्या टेस्ट ड्राइव्ह आणि बुकींगसाठी ग्राहकांनी माई ह्युंदाईच्या कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शोरूम्सना भेट द्यावी असं आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केलं आहे.
यावेळी माई ह्युंदाईचे जनरल मॅनेजर विशाल वडेर, जनरल मॅनेजर (सेल्स) गिरीश पाटील, सुनिल खांडेकर तसेच मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक आशिष पवार यांनी केलं..