*डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक तर्फे गौरी गीते स्पर्धा उत्साहात*
कोल्हापूर
डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या हिरकणी मंच तर्फे आयोजित गौरी गीते, झिम्मा फुगडी, काटवट कणा, घागर घुमविने या स्पर्धा अत्यंत उत्साहात झाल्या.
सहभागी मुलींनी अत्यंत कौशल्याने आपली कला सादर केली.
कु. श्रुती शेंडगे हिला “ऑल राऊंडर दुर्गा”* म्हणून गौरवण्यात आले.प्राचार्य डॉ.महादेव नरके आणि स्टाफ यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
हे बोलताना प्राचार्य नरके यांनी सांगितले की, आपली संस्कृती ही खूप महत्त्वाची आहे. आणि ती जपण्यासाठी हिरकणी मंचने केलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.
सौ.सुलोचना बागडी , प्रा.शीतल साळोखे यांनी परीक्षण केले.
हिरकणी मंच प्रमुख प्रा. नीलम रणदिवे, प्रा.ऐश्वर्या पाटील , प्रा.तेजस्विनी किल्लेदार, प्रा. स्वाती पाटील ,प्रा.पूजा मोरे यांच्यासह टीम हिरकणी यांनी सुंदर नियोजन केले.
फोटो : डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने आयोजित गौरी गीते स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना प्राचार्य डॉ.महादेव नरके.
सोबत हिरकणी मंच समन्वयक प्रा.नीलम रणदिवे, सुलोचना बागडी , प्रा.शीतल साळोखे आदी