गोशिमाअध्यक्ष पदी स्वरूप कदम, उपाध्यक्ष पदी सुनिल शेळके, मानद सचिव पदी संजय ऊर्फ जितेंद्र देशिंगे व खजिनदार पदी अमोल यादव

Spread the news

 

गोशिमाअध्यक्ष पदी स्वरूप कदम, उपाध्यक्ष पदी सुनिल शेळके, मानद सचिव पदी संजय ऊर्फ जितेंद्र देशिंगे व खजिनदार पदी अमोल यादव

कोल्हापूर

गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन [ गोशिमा ] संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सन २०२४-२५ सालासाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यामध्ये अध्यक्ष पदी स्वरूप कदम, उपाध्यक्ष पदी सुनिल शेळके, मानद सचिव पदी संजय ऊर्फ जितेंद्र देशिंगे व खजिनदार पदी अमोल यादव यांच्या नावांना एकमताने मान्यता देण्यात आली.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी राजीव परीख होते.

नूतन अध्यक्ष यांनी संस्थेच्या वतीने उद्योजकांच्या अडचणी सोडवणे , मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेचे काम केले जाईल तसेच इतर उद्योग उपयोगी कामे करणार असल्याचा मानस व्यक्त केला.

माजी अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई यांनी आपल्या कार्यकाळात झालेले औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्ता , औद्योगिक वसाहतीशी संलग्न ग्रामपंचायतींना कचरा उठाव करणेसाठी केलेला प्रयत्न , वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणेसाठी केलेले प्रयत्न , औद्योगिक वसाहतीमधील असे अनेक प्रश्न व सुविधा आमच्या कार्यकारिणीच्या काळात झाल्या असे सांगितले व संचालक मंडळाचे आभार मानले.

यावेळी सचिन शिरगांवकर , दिपक चोरगे , नचिकेत कुंभोजकर , राजवर्धन जगदाळे , बंडोपंत यादव , अनिरुद्ध तगारे, रणजीत मोरे , रणजीत पाटील , रामचंद्र लोहार , व्ही. आर. जगताप उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!