*करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील श्री महालक्ष्मी धर्मशाळेच्या मंडप व गणपती मंडप सजावटीचे उद्घाटन*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची उपस्थिती
*यावर्षी श्री महालक्ष्मी धर्मशाळा भक्त मंडळाचा १३४ वा गणेशोत्सव*
*कोल्हापूर, दि. ७:*
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील श्री महालक्ष्मी धर्मशाळा भक्त मंडळाचा गणपती मंडप व सजावटीचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावर्षी या मंडळाचा १३४ वा गणेशोत्सव आहे
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गरुड मंडपाचे सुरू असलेले काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल आणि परंपरेप्रमाणे त्या मंडपातच या गणरायाची प्रतिष्ठापना होईल. जिथे -जिथे मोठी देवस्थाने आहेत, तिथे- तिथे मोफत महाप्रसादाची व्यवस्था देवस्थान मंडळाच्यावतीने केली जाते. कोल्हापुरात ही व्यवस्था श्री. महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने केली जात आहे. हे अत्यंत उदात्त आणि पुण्याईचे काम आहे. या उपक्रमामध्ये त्यांना लागेल ती मदत करू.
श्री. मुश्रीफ म्हणाले, गेल्या वर्षी गणेशोत्सवापूर्वी आठवडाभर आधीच मला मंत्री पद मिळाले होते. परंतु; पालकमंत्री पद जाहीर झाले नव्हते. त्यावेळी याच गणरायासमोर मी मला पालकमंत्री पद मिळावे, अशी प्रार्थना केली होती. आठवडाभरातच ते मिळालेही. या यावर्षीही मी माझ्या मनातली मागणी या गणरायासमोर मागत आहे, ती निश्चितच पूर्ण होईल. कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील जनताच माझी निवडणूक हातात घेईल आणि मोठ्या मताधिक्याने माझा विजय निश्चितपणे होईल.
यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. श्री गणरायाची आरती व दर्शन घेत पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, टीडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान मंडळाचे सचिव शिवराज नाईकवाडे, अदिल फरास, प्रा. जयंत पाटील, मंडळाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
……………
*कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिर परिसरातील श्री. महालक्ष्मी धर्मशाळा मंडळाच्या गणपतीचे मंडप व सजावटीचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रमुख मान्यवर.*
===========