*स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्वप्नातील कागल निर्मितीसाठी साथ द्या…….* *राजे समरर्जीतसिंह घाटगे.* *माजी खास.राजू शेट्टी यांची घेतली भेट*

Spread the news

*स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्वप्नातील कागल निर्मितीसाठी साथ द्या…….*

*राजे समरर्जीतसिंह घाटगे.*

*माजी खास.राजू शेट्टी यांची घेतली भेट*

कागल, प्रतिनिधी

स्व. राजेसाहेब यांनी समाजकारणात कागलची ओळख ” *आदर्श कागल”* व्हावे हे स्वप्न पाहिले होते.माझी ही तीच भूमिका आहे. स्व. राजेसाहेब यांच्या स्वप्नातील कागल निर्माण करण्यासाठी मला साथ द्या अशी विनंती शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील उपस्थित होते.

शाहू ग्रुप चे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकरी आणि सर्वसामान्य आर्थिक सक्षम झाल्याशिवाय शाश्वत विकास साधता येणार नाही ही स्वर्गीय राजेसाहेब यांची विचारधारा होती. म्हणूनच त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस याना केंद्रस्थानी ठेवले. खा.राजू शेट्टी हे सुद्धा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र काम करत आहेत. दोघांचा मार्ग एकच आहे. स्व. राजसाहेब आणि राजू शेट्टी साहेब जवळचे संबंध होते. विधायक कामासाठी आम्हीही अनेक वेळा एकमेकांशी भेटलो आहोत. स्व. राजेसाहेब यांचे समाजभिमुख विचार पुढे नेण्याचा माझाही प्रयत्न आहे. यामध्ये मला सहकार्य करा. अशी आग्रही विनंती श्री घाटगे यांनी केली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!