“भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण
अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र” कार्यशाळा
कोल्हापूर
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण” यांचेकडून सर्व प्रकारच्या खाद्यपेय पदार्थ व्यावसायिकांकरता “Food Safety Training & Certification” ( FOSTAC) म्हणजेच “अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र” कार्यशाळा संपूर्ण देशभर घेण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर हाॅटेल मालक संघाच्या सहकार्याने व DCI Skills Pvt. Ltd. Sangli यांच्या पुढाकाराने कोल्हापूर व आजू बाजूच्या परिसरातील लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या खाद्यगृह व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणेत आली होती. या कार्यशाळेत सुमारे १२५ हून अधिक खाद्यगृह व्यावसायिकांनी प्रशिक्षण घेतले.
FSSAI कडील तज्ञ प्रशिक्षक व ऑडीटर सौ. सुलक्षणा श्रीमावले, मुंबई यांनी FSSAI कायद्यातील नियमावलीनुसार सर्वांना प्रशिक्षण दिले.
कोल्हापूर हाॅटेल मालक संघाचे सचिव सिध्दार्थ लाटकर यांनी सुरूवातीला उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले व शेवटी संघाचे उपाध्यक्ष सचिन शानभाग यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी संघाचे सहसचिव संदीप सुर्यवंशी, खजिनदार सुशांत पै, शंकरराव यमगेकर, आशिष रामबाग, दिपक कुरबेट्टी, गौरव कामत, श्रेयस घाटे, विजयराज खोबरे, शत्रुंजय इंगळे, इ तसेच DCI Skills Pvt. Ltd. चे अस्लम कोथळी, आफरीन कोतवाल, राजू मुल्ला, निशा लोनिया, इ. हजर होते.