*आदरनीय शरद पवारसाहेबांना जातीयवादी म्हणणाऱ्या हसन मुश्रीफ यांना महाराष्ट्र माफ करणार नाही*
*समरजितसिंह घाटगे*
- *शरद पवार साहेबांची मुश्रीफ यांनी माफी मागावी*7
कागल प्रतिनिधी दि.
देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार यांनी कागलमध्ये काल आपल्या पक्षाचा भव्य मेळावा घेतला ही त्यांची चूक होती का? यावर प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्यासारखे जेष्ठ नेते माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजातील माणसाच्या मागे का लागले आहेत. अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेचे मला आश्चर्य वाटते त्यांनी माझ्यावर कितीही टीका करावी परंतु देशपातळीवर काम करणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्यावर असा आरोप करणे साप चुकीचे आहे. त्याचा मी निषेध करतो या विधानावर पवार साहेबांची त्यानी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. प्रत्युत्तरा दाखल असा घनाघात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या प्रतिक्रियेवर केला आहे.
‘मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाच टार्गेट केले असून आज पर्यंत आमदारकी मंत्रीपदे,सर्वकाही दिलेल्या नेत्यांवरच मुश्रीफ यांनी जातीवाचक आरोप केला आहे.मुश्रीफसाहेब मला काही बोलतात ते बोलू देत, पण मला त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा राग, संताप आणि खंत वाटते. पवारसाहेबांचे अनेक वर्षाचे राजकारण आहे. विरोधी पक्षाने ही त्यांच्यावर असे बोलायचे धाडस केले नाही.मात्र ते काम पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. मुश्रीफ यांनी आता शरद पवार यांच्यावर जातीवाचक आरोप केला.त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदे दिली तेंव्हा तुम्ही अल्पसंख्यांक नव्हता का?’ असा सवाल घाटगे यांनी उपस्थित केला.
‘ते तुमच्या वडिलांच्या वयाच्या आहेत. त्यांच्यावर कुणीही असले आरोप करायचे धाडस करत नाही. ते तुम्ही केलं, तुम्ही हे घोर पाप केलं. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, कोल्हापूर सारख्या पुरोगामी विचाराच्या जिल्ह्यात हे चालणार नाही. समरजितसिंह घाटगे यांना काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही जाहीर माफी मागावी.’ अशा शब्दात घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावले आहे.