विमानतळाशेजारील नागरिकांचा प्रश्न मार्गी

Spread the news

 

विमानतळाशेजारील नागरिकांचा प्रश्न मार्गी

 

कोल्हापूर

विमानतळाच्या बाजूने जाणाऱ्या नेर्ली तामगाव रस्त्यासाठी, पर्यायी नवा मार्ग सुचवन्यात आलाय. त्याला विमानतळ प्राधिकरणाने तत्वता मान्यता दिली असून
त्याचा प्रस्ताव लवकरच सादर करण्याच्या सूचना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादन पुनर्वसन, या प्रश्नासंदर्भात आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार सतेज पाटील बोलत होते.

विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादन पुनर्वसन आणि अन्य विकास कामे तसचं नवीन विमानसेवा सुरू करण्याबाबत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी खासदार शाहू महाराज, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सध्या विमानतळाची धावपट्टी 1970 मीटर झाली आहे. ती 2300 मीटर पर्यंत करण्याकरिता अतिरिक्त 64 एकर जमीन संपादन करावे लागणार आहे. मात्र
2022 मध्ये करण्यात आलेल्या सर्वे मध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या. 64 एकर जमीन संपादित करावी लागणार असल्याने यातील लक्ष्मी वाडी येथील 51 लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळं 51 कुटुंबांचे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता होती. त्यानुसार या बैठकीत चर्चा करण्यात आली. या 51 लोकांना बाराशे चौरस फुटाऐवजी आता त्यांना सतराशे ते अठराशे चौ. फुटाचे भूखंड देण्यात येणार आहेत. याबाबत बैठकीत प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. तसचं विमानतळ विस्तारीकरणासाठी काही मिळकतींचा नव्याने सर्वे करण्याचा निर्णय देखील आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान
कोल्हापूर नेर्ली तामगांव, उजळाईवाडी, बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला
जोडणेच्या भूसंपादनाबाबतही चर्चा करण्यात आली. या रस्त्या करिता, विमानतळाच्या बाजूने असलेली काही जमीन संपादित करावी लागणार आहे. मात्र, कोल्हापूर नेर्ली तामगांव, उजळाईवाडी, या बायपास रस्त्या करिता नव्याने पर्यायी मार्ग सुचवन्यात आलाय. त्याला विमानतळ प्राधिकरणाने तत्वता मान्यता दिली असून त्याचा प्रस्ताव लवकरच सादर करण्याच्या सूचना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे .. दरम्यान, कोल्हापूर विमानसेवेबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.. कोल्हापूर दिल्ली त्याचबरोबर कोल्हापूर गोवा या विमान सेवेकरीता, खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 9 सप्टेंबर रोजी विमानतळाच्या ठिकाणी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, करवीरचे प्रांताधिकारी हरिष धार्मिक,
जिल्हा भूसंपादन क्रमांक बाराचे उपजिल्हाधिकारी विवेक काळे, करवीरचे भूमी अभिलेख अधिकारी किरण माने, महावितरणच कार्यकारी अभियंता दत्तात्रय बनगे यांच्यासह, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!