महायुतीच्या काळे कारनाम्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला निषेध
कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज कोल्हापुरात शिवाजी चौकात गोपाळकाला दहीहंडी सणानिमित्त जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते ‘ *महायुतीचे काळे कारनामे* ‘ हे वृतपत्र वाटून तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे शिवरायांचा जो पुतळा कोसळला या घटनेच्या निषेधार्थ देखील महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार आहे. सर्वप्रथम राज्याचा विचार करणे ऐवजी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी दिलेल्या तुकड्यावर समाधानी राहून उघड्या डोळ्यांनी आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्राचा देशातील क्रमांक खाली घसरताना पाहणारे हे महायुतीचे दळभद्री सरकार आहे.
महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ असल्यामुळे महायुतीचे हे सुरू असलेले काळे कारनामे सर्वसामान्य जनतेसमोर पोहोचवण्याकरिता *महायुतीचे काळे कारनामे* हे वृत्तपत्र वाटून व फुगे सोडून सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी व्ही बी पाटील, आर.के. पोवार, महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले कार्याध्यक्ष अनिल घाटगे सरचिटणीस सुनील देसाई, महेश जाधव महादेव पाटील, करवीर तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील अरुणा पाटील, गणेश जाधव, मुसाभाई कुलकर्णी, सरोजिनी जाधव, गणेश नलवडे, राजू मालेकर, फिरोज सरगुर, सायली महाडिक, रियाज कागदी अविनाश माने , दिनकर धोंगडे , दिनकर कांबळे , संदीप साळुंखे, सतीश देसाई, फिरोज खान उस्ताद, चंद्रकांत सूर्यवंशी, सुनील सर्वर शितल तेवढे अंजली पोळ नागेश जाधव नागेश शिंदे अमोल जाधव मोहन कांबळे छाया कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.