राज्यस्तरीय व्यापार बंद तात्पुरता स्थगित* *बाजार समिती, जीएसटी व अन्य विषयावर समिती गठीत*

Spread the news

*राज्यस्तरीय व्यापार बंद तात्पुरता स्थगित*

*बाजार समिती, जीएसटी व अन्य विषयावर समिती गठीत*

मुंबई ः महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे 27 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहीती कृती समिती तर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. राज्यस्तरीय कृती समिती च्या बंद ची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मा. आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ व पणन, वित्त सहकार, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, मा. पणन संचालक व विविध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रस्ताविक केले. कृती समिती चे समन्वय राजेंद्र बाठीया व दि पुना मर्चन्टस चेंबर चे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी बाजार समिती च्या विविध प्रश्‍नाची मांडणी केली. फॅम चे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी जीएसटी चे प्रश्‍न मांडले. मोहन गुरनानी, दिपेन अग्रवाल व भिमजी भानुशाली यांनी चर्चेमध्ये भाग घेतला.

सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व प्रश्‍न समजुन घेतले व बाजार समिती विषयासाठी तसेच जीएसटी व अन्य विषयांसाठी कृती समिती सदस्य व मु‘य सचिव व उच्च अधिकारी वर्गाची तीन समिती गठीत करण्यात आली. सदर समितीने 30 दिवसामध्ये योग्य निर्णय घेण्याचे निर्देश मान. उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत.
दरम्यान या बैठकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून व्यापार्‍यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली व बंद मागे घ्यावा असे आवाहन केले.
उद्योग मंत्री उदय सामंत, नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यापार्‍यांची भूमिका सरकार कडे प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन बैठक आयोजनामध्ये सहभाग घेतला.
याबाबत कृती समितीने चर्चा करून 27 तारखेचा एकदिवसीय राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, फॅम चे सचिव प्रितेश शहा, ग्रोमा चे सचिव नितेश वीरा, पुना मर्चंट चेंबर चे माजी अध्यक्ष प्रविण चोरबोले, अनिल भन्साली उपस्थित होते. ग्रोमा चे अध्यक्ष भीमजी भानुशाली यांनी आभार मानले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी एलबीटी कायदा 2015 साली रद्द होऊनही अद्याप याबाबत नोटीस येत असल्याचे निदर्शनास आणुन दिले व राज्यातील सर्व महानगरपालिकामधील एलबीटी विभाग बंद करण्याची मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे केली. त्यास त्यांनी स्विकृती देऊन अधिकार्‍यांना यासंबंधी आदेश काढण्याचे निर्देश दिले.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!