आगामी विधानसभेसाठी भाजपा पदाधिकारी यांनी सज्ज राहावे : आमदार अभय पाटील

Spread the news

आगामी विधानसभेसाठी भाजपा पदाधिकारी यांनी सज्ज राहावे : आमदार अभय पाटील

कोल्हापूर
विधानसभा 2024 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्य, जिल्हा, मंडल स्तरावर संघटनात्मक तयारी सुरू झाली आहे. याचा अनुषंगाने आज भाजपा जिल्हा कार्यालयात विधानसभा प्रवासी नेते आमदार अभय पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर लोकसभा अंतर्गत विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, विधानसभा प्रवासी नेते समन्वयक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित उर्फ नाना कदम, गायत्री राऊत, डॉक्टर राजवर्धन, संजय सावंत यांची प्रमुख उपस्थित होती.

आमदार अभय पाटील यांनी
पहिल्या सत्रामध्ये कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर तर दुसऱ्या सत्रामध्ये राधानगरी, चंदगड, कागल या विधानसभांच्या
कामांचा आढावा मंडल अध्यक्षांच्या माध्यमातून घेतला.
मंडल अध्यक्ष, मंडल प्रभारी व बूथ अध्यक्ष यांच्या समन्वयाने प्रत्येकाने आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये बूथ स्तरावर कार्यरत राहण्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.
मंडल प्रभारी यांनी येत्या आठवड्याभरामध्ये बूथ रचना पूर्ण करून त्याची वर्गवारी करण्याच्या सूचना या प्रसंगी त्यांनी दिल्या त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस यांनी प्रत्येक मंडलात आपला प्रवास पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळत आहे या सर्वांचा बूथनिहाय तपशील एकत्र करून मतदारांच्या पर्यंत घरापर्यंत जाऊन संपर्क साधण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.

प्रारंभी विधानसभा प्रवासी नेता समन्वयक प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आजच्या बैठकीची रूपरेषा स्पष्ट करत आगामी काळात सातत्याने मंडल आणि बुथवर अशाच पद्धतीच्या मिटींगचे आयोजन आमदार अभय पाटील यांचे होणार असून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी येत्या विधानसभेसाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.

खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रातील शक्ती केंद्र, बूथ अध्यक्ष अशा सर्वांचा आढावा घेत आगामी काळात आमदार अभय पाटील यांच्या माध्यमातून होणाऱ्या विविध संघटनात्मक कार्यांसाठी आणि 2024 निवडणुकीसाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कार्यरत राहतील असे आश्वस्थ केले.

याप्रसंगी कोल्हापूर लोकसभा क्षेत्रातील जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी मोर्चा अध्यक्ष, प्रभारी, विस्तारक उपस्थित होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!