*तपोवनवरील महिला सन्मान सोहळ्याच्या तयारीची महायुतीच्या नेते मंडळींकडून पाहणी*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती…..*
*आज लाखावर महिलांच्या उपस्थितीत होणार महिला सन्मान सोहळा*
*कोल्हापूर, दि. २१:*
कोल्हापुरात आज गुरुवार दि. २२ महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत तपोवन मैदानावर सकाळी १०.०० वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मंत्री कोल्हापुरात येत आहेत. एक लाखावर अधिक महिलांच्या उपस्थितीत हा महिला सन्मान सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी महायुतीच्या नेतेमंडळींनी केली. यामध्ये पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदिल फरास, भाजपचे महानगराध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांचा समावेश होता.
यावेळी नेतेमंडळींनी महिलांची बैठक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदी बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
………………
*कोल्हापुरात आज तपोवन मैदानावर होत असलेल्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला सन्मान सोहळ्याच्या तयारीचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महायुतीच्या नेते मंडळींनी आढावा घेतला.*
============