भाजपा ग्रामीण (पश्चिम) जिल्हाध्यक्ष पदी नाथाजी पाटील यांची नियुक्ती

Spread the news

भाजपा ग्रामीण (पश्चिम) जिल्हाध्यक्ष पदी नाथाजी पाटील यांची नियुक्ती
कोल्हापूर दि.२१ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाच्या माध्यमातून काही जिल्ह्यांत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने आज मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थिती मध्ये भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ग्रामीण (पश्चिम)च्या जिल्हाध्यक्ष पदी नाथाजी तुकाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
नाथाजी पाटील यांनी आपल्या २७ वर्षाच्या प्रवासात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवा मोर्चा, उपाध्यक्ष, सरचिटणीस या माध्यमातून काम करत अनेक संघटनात्मक जबाबदा-या सक्षमपणे निभावल्या आहेत.
नाथाजी पाटील :-
भारतीय जनता पार्टीसाठी निष्ठेने काम करत असल्याची पोच पावती जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाली असल्याचे सांगत आगामी काळात पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसबोत समन्वय साधून संघटनात्मक कार्यासाठी काम करत राहणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!