शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वास सुतार यांची निवड; कार्याध्यक्ष सारिका कासोटे, खजिनदार जगन्नाथ पाटील*

Spread the news

🌹 *शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वास सुतार यांची निवड; कार्याध्यक्ष सारिका कासोटे, खजिनदार जगन्नाथ पाटील*

कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शाखा आहेत. कोल्हापूर जिल्हा शिक्षण विस्ताराधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा शिक्षण विस्ताराधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास सुतार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विश्वास सुतार उपक्रमशील व शिस्तप्रिय प्रशासक आहेत. तसेच ते साहित्यिक आणि गायक-संगीतकार म्हणून ओळखले जातात. उपाध्यक्ष पदासाठी दीपक कामत, कार्याध्यक्षपदी सारीका कासोटे आणि खजिनदार पदावर जगन्नाथ तथा जे. टी पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच राज्य प्रतिनिधी म्हणून आर. वाय. ठोकळ यांची निवड घोषित करण्यात आली.

ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व सल्लागार शंकर यादव, आनंदराव आकुर्डेकर, भीमराव टोणपे, विजय ओतारी यांनी निवडी जाहीर केल्या. जिल्हास्तरीय अधिवेशनात तालुका प्रतिनिधींची निवड होणार असल्याचे घोषित करण्यात आले.

निवडीनंतर विश्वास सुतार व सारीका कासोटे यांनी ‘संघटना बांधणी व समस्या सोडवणूकीसाठी प्रयत्न करू’ असे स्पष्ट केले. बैठकीस शिवाजी मानकर, बसवराज गुरव, विलास पाटील, जयश्री जाधव, सुमन सुभेदार, डी. सी. कुंभार, रामचंद्र गावडे आदी उपस्थित होते. धनाजी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!